10 मिनिटं सुरक्षा काढून दाखवा, संजय राऊत पुन्हा दिसणार नाही ! नितेश राणेंचा थेट इशारा

778 0

विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे या संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात घमासान सुरु आहे. महाराष्ट्रातील विधिमंडळाचा हा अपमान असून संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करा, अशी मागणी जोर धरत असतानाच, नितेश राणेंनी थेट इशारा संजय राऊत यांना दिला आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज संजय राऊत यांच्या वक्तव्याने खडाजंगी सुरु असतानाच नितेश राणे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विधानसभेत नितेश राणे म्हणाले,संजय राऊत रोज सकाळपासून ऐकावं लागतंय. काय घेऊन खाललंय आपण त्याचं? त्याचा आणि शिवसेनेचा इथे काय संबंध? सामनामध्ये येण्याच्या आधी तो लोकसभेत असायचा. लोकप्रभामध्ये शिवसेनेच्या विरोधात त्याचे लेख असायचे. संजय राऊतने शिवसेना आणि हिंदुहृदय सम्राट यांच्या विरोधातही लिहिलेलं आहे. संजय राऊत पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतो. देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना तो शिव्या घालतो. त्याचं फक्त १० मिनिटं संरक्षण काढा, तो उद्या दिसणार नाही, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. भर विधानसभेत राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

ससेच संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात बोलताना अमित शाह यांचा उल्लेख करताना पुन्हा एकदा मोगँबो हा शब्द वापरला. त्यावरून नितेश राणे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. याआधी नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीवरून टीका केली होती. संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर तो अधिक उफाळून येण्याची चिन्ह आहेत.

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी प्रमाणपत्र देण्यास अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध

Posted by - September 10, 2023 0
नागपूर : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी जातीचे प्रमाणपत्र (Maratha Reservation) देण्याला अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे. शनिवारी…
rohit pawar and narendra modi

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Posted by - April 30, 2024 0
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पुण्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.…

अखेर ठरलं ! पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना “या” दिवशी होणार जाहीर

Posted by - January 30, 2022 0
पुणे महानगर पालिका निवडणुकीचा प्रारूप प्रभाग आराखडा एक फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान…

पूर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत – जयंत पाटील

Posted by - July 19, 2022 0
मुंबई : राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ताबडतोब मदतकार्य सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यतूनच द्यावे लागणार – ॲड. श्री.पुरुषोत्तम खेडेकर

Posted by - October 21, 2023 0
पुणे : मराठा (Maratha Reservation) सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री. पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्री. गंगाधर बनबरे, सचिव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *