रिलायन्सची दमदार कामगिरी, तिमाहिमध्ये 16 हजार 203 कोटींचा नफा

370 0

मुंबई -रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी मार्चअखेर तिमाहीत २२.५ टक्क्यांच्या भरीव वाढीसह, १६,२०३ कोटी रुपयांच्या तिमाही नफ्याची नोंद करणारी आर्थिक कामगिरी जाहीर केली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने १३ हजार २२७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता.

विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कंपनीची तिमाहीतील कामगिरी मात्र खालावलेली दिसली. देशातील या सर्वात मोठय़ा खासगी क्षेत्रातील कंपनीने तिमाहीतील एकत्रित महसूल २,११,८८७ कोटी रुपयांवर नेला आहे, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ३६.८ टक्क्यांनी वधारला आहे. तसेच सरलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ६७,८४५ कोटींच्या निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. याचबरोबर रिलायन्स समूहाने १०० अब्ज डॉलर म्हणजेच ७.९३ लाख कोटी महसुलाचा टप्पा गाठत नवीन विक्रम केला आहे. त्याचप्रमाणे किराणा व्यवसायाने (रिलायन्स रिटेल) देखील चांगली कामगिरी बजावत उच्चांकी ५८,०१९ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

नफ्यात ‘जिओ’चे योगदान ३,७९५ कोटींचे

दूरसंचार व डिजिटल व्यवसाय एकवटलेल्या रिलायन्स जिओला सरलेल्या तिमाहीत ४,१७३ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात १५.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढत २०,९०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
रिलायन्सच्या नवीन अक्षय्य ऊर्जा व्यवसाय आणि नवीन तंत्रज्ञानाधारित व्यवसायातील कामगिरी उत्साहदायी आहे.

आम्ही लवकरच जामनगरमध्ये ५,००० एकरमध्ये न्यू एनर्जी गीगा फॅक्टरी कॉम्प्लेक्स उभारणार आहोत अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

#ACCIDENT : जयपूरमध्ये चार्टर विमानाने अचानक घेतला पेट; नेमकं काय घडलं , VIDEO

Posted by - January 28, 2023 0
जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये चार्टर विमानाने अचानक पेट घेतल्याची घटना समोर येते आहे. हवेत उड्डाण घेतल्यानंतर लगेचच या चार्टर्ड विमानाने…

सराईत गुन्हेदाराला पुण्यातील शिवाजीनगर पोलीसांनी शिताफीनं केली अटक

Posted by - October 30, 2022 0
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या सराईताला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी (दि.27) केली…

आयएनएस विक्रांत बचाव निधीप्रकरण, सोमय्या पिता-पुत्र पोलीस चौकशीला गैरहजर

Posted by - April 9, 2022 0
मुंबई- आय एन एस विक्रांत या युद्धनौका निधी प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉमबे पोलीस…

नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत; समोर आलं ‘हे’ मोठं कारण

Posted by - April 16, 2023 0
नागपूर: महाविकास आघाडीची आज दुसरी वज्रमूठ सभा नागपूर येथे होणार आहे. या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *