3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

246 0

मुंबई : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. मंत्री श्री. विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते.तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे असते.

आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसुली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या 3 हजार 110 साझे आणि 518 महसुली मंडळ कार्यालयासाठी 3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण 3 हजार 628 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 7 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

पुणे महसुली विभागाअंतर्गत एकूण 602 तलाठी साझे आणि 100 महसुली मंडळे आहेत. अमरावती महसुली विभागाअंतर्गत एकूण 106 तलाठी साझे आणि 18 महसुली मंडळे आहेत. नागपूर महसूली विभागाअंतर्गत एकूण 478 तलाठी साझे आणि 80 महसुली मंडळे आहेत. औरंगाबाद महसुली विभागाअंतर्गत एकूण 685 तलाठी साझे आणि 114 महसुली मंडळे आहेत. नाशिक महसुली विभागाअंतर्गत एकूण 689 तलाठी साझे आणि 115 महसुली मंडळे आहेत. कोकण महसुली विभागाअंतर्गत एकूण 550 तलाठी साझे आणि 91 महसुली मंडळे आहेत.

Share This News

Related Post

अजित पवारांनी दिलेल्या अंबाबाईच्या मूर्तीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या 1200 भेट वस्तूंचा होणार लिलाव

Posted by - September 12, 2022 0
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम ही ‘नमामिगंगे’ अभियानाला…

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा ; राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 19, 2022 0
मुंबई : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री…

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या खोलीत सापडली काही औषधे; पोलिसांचा सर्व बाजूने बारकाईने तपास

Posted by - March 11, 2023 0
नवी दिल्ली : प्रसिद्ध बॉलीवूड लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. होळी साजरी…

अरे बापरे ! मोक्कातील आरोपीला लॉकअप बाहेर काढून आरोपी पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Posted by - February 3, 2023 0
पुणे : सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. मिळालेल्या धक्कादायक…
Radhakrishna Vikhe Patil

Contract Recruitment : कत्रांटी तहसीलदार भरतीची जाहिरात अखेर रद्द; महसूलमंत्र्यांनी भरतीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

Posted by - October 1, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी शासनाकडून कंत्राटी (Contract Recruitment) तहसीलदार नियुक्तीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीवरून राज्यात मोठा गोंधळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *