Re-certification of autorickshaw meters : ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे आवाहन

286 0

पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२  पासून भाडेवाढ लागू केली असल्याने ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करावयाचे आहे.

ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण विहित कालमर्यादेत व सुरळीतपणे पूर्ण होण्याकरिता मीटर तपासणी ट्रॅकचे विकेंद्रीकरण करण्यात आलेले आहे. अलंकार पोलीस स्टेशनसमोर, कर्वेनगर, फुलेनगर आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी  लेन नं.३, दिवे (पासिंग वाहने) आणि इऑन आयटी पार्कजवळ खराडी पोलीस चौकीसमोर खराडी या ट्रॅकवर तपासणी होणार आहे.

या सर्व ट्रॅकवर सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज करण्यात येणार आहे. सर्व संबंधित रिक्षाचालकांनी कॅलीब्रेशन पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी जवळच्या ट्रॅकवर सादर कराव्यात असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

#MAHARASHTRA POLITICS : “… म्हणून अजित दादा पवार यांना मुख्यमंत्री करता आले नाही ! ” शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Posted by - February 11, 2023 0
नाशिक : अजित पवार यांना मुख्यमंत्री पद का दिले नाही यावरून टीकाटिप्पणी होत असताना शरद पवार यांनी थेट उत्तर देऊन…
Birthday Celebration

चर्चा तर होणारंच ! पुण्यातील ‘या’ गावाने एकाच दिवशी साजरा केला 51 जणांचा बड्डे

Posted by - June 2, 2023 0
पुणे : 1 जून हा वाढदिवस (Birthday) दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक लोकांचा वाढदिवस याच दिवशी साजरा केला जातो.…

राज्य सरकार यापुढे असेच लोकहिताचे निर्णय घेत राहील; मनसेच्या एकमेव आमदाराने मानले राज्य सरकारचे आभार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: आज झालेल्या बैठकीत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ…
Sudhi

धक्कादायक! प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याचे कार अपघातात निधन

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : काल रात्री ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *