मविआकडून पुन्हा रवींद्र धंगेकर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

435 0

भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी भाजप आणि विरोधी महाविकास आघाडी यांनी तयारी सुरु केली आहे. भाजपकडून पुणे लोकसभेसाठी तीन नावांचा विचार सुरु आहे तर महाविकास आघाडी पुन्हा एकदा नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाणे पुन्हा वापरण्याच्या विचारात आहे.

‘मविआ’कडून कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांना खासदारकीसाठी पुण्याच्या पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं. रवींद्र धंगेकर यांच्याबरोबरच मोहन जोशी यांचे नाव देखील चर्चेत आहे.

भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे. वास्तविक गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट किंवा मुलगा गौरव बापट, पुण्याचे माजी महापैर मुरलीधर मोहळ, पुण्याचे माजी खासदार संजय काकडे, यांच्यासोबतच मेधा कुलकर्णी आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावं चर्चेत होती. मात्र जगदीश मुळीक यांनी बापट यांच्या निधनानंतर लगेच आपल्या वाढदिवसानिमित्त झळकावलेल्या पोस्टरमध्ये स्वतःचा उल्लेख खासदार म्हणून केला होता. त्यामुळे त्यांच्या नावावर फुली पडली आहे. मेधा कुलकर्णी यांचं नाव देखील मागे पडलं आहे.

त्यामुळे स्वरदा बापट किंवा मुलगा गौरव बापट, माजी महापैर मुरलीधर मोहळ, माजी खासदार संजय काकडे यांची नावे आता चर्चेत आहेत. त्यापैकी एकाला तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाने पुणे लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यास विधानसभा पोटनिवडणुकीसारखी लोकसभा पोटनिवडणूक देखील रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंडाचे याअगोदर ‘6’ वेळा केले होते प्रयत्न

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) हे नाव प्रचंड चर्चेत आहे. अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारला…
Pankaja-Munde

BJP National Executive : भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर; पंकजा मुंडेकडे दिली ‘ही’ जबाबदारी

Posted by - July 29, 2023 0
पुणे : भाजपकडून नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची (BJP National Executive) यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 38 जणांना स्थान देण्यात…
Punit Balan

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस भेट

Posted by - May 2, 2024 0
पुणे : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने (Punit Balan) शिखर शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) येथील वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलीत श्री ज्ञानमंदिर…
Heatstroke

Pune News Update : पुण्यात रेकॉर्ड ब्रेक तापमान! तापमानाचा पारा 42 वर; पुणेकर झाले हैराण

Posted by - April 29, 2024 0
Pune : पुण्यात उन्हाचा पारा 42 अंशावर पोहोचला आहे. आज पुण्याच्या यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. आज कोणाचा…

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सांगलीच्या संकेत सरगर यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Posted by - July 30, 2022 0
सांगली: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *