राणा यांच्या खार येथील घराची मुंबई महापालिकेच्या पथकाकडून आज पाहणी होणार

358 0

मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेचे एक पथक राणा यांच्या खार येथील घराची पाहणी करणार आहेत. या घरामध्ये अवैध बांधकाम केल्याचा संशय महापालिकेला आहे. याबाबत आलेल्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने नोटीस दिली आहे.

रवी राणा यांच्या मुंबईच्या खारमधील फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम असल्याचा आरोप करून मुंबई महापालिकेकडून या फ्लॅटचं 4 मे रोजी मोजमाप करण्यात येईल अशी नोटिस पाठवण्यात आली आहे. सोसायटीचे पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी राणा यांच्या नावे ही नोटिस पाठवण्यात आली आहे.

यांना बीएमसीने नोटीस बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या नोटीसनुसार, मुंबई बीएमसी खारच्या इमारतीत असलेल्या रवी राणा यांच्या घराची पाहणी करणार आहे. प्रत्यक्षात घराच्या आराखड्यात छेडछाड करून बेकायदा बांधकाम केल्याचा बीएमसीला संशय आहे. अशा स्थितीत अति बांधकाम आणि काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून बीएमसीने ही तपासणी नोटीस दिली आहे. मात्र राणा दांपत्य गेल्या 10 दिवसापासून तुरुंगात आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंद दारावर नोटीस चिकटवली.

आज दुपारी १२ वाजता मुंबई महापालिकेचे पथक राणा यांच्या खार येथील घराची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.

Share This News

Related Post

Raigad Priyanka Sucide

सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल; 3 वर्षांपूर्वी झाले होते लग्न

Posted by - June 3, 2023 0
रायगड : रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेमघर या गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली…

अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही ! केतकी चितळेला राज ठाकरे यांनी सुनावले !

Posted by - May 14, 2022 0
मुंबई- अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवार यांच्याशी संबंधित असलेल्या पोस्टवरून सध्या राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार यांच्यावर…

नेमका कसा झाला विनायक मेटेंचा अपघात; पोलीस अहवाल TOP NEWS मराठीच्या हाती

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…

पुण्यात धक्कादायक प्रकार : वडिलांसमान असलेल्या काकानेच केले दोन सख्या बहिणींवर अत्याचार

Posted by - January 23, 2023 0
पुणे : कामानिमित्त दिल्लीला गेलेल्या आई-वडिलांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना त्यांच्या काकाकडे राहण्यास ठेवले. पण वडिलांसमान असलेल्या काकांनच या मुलींचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *