ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

1133 0

मुंबई- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री सीमा देव, अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव आणि नाती आर्य देव आणि अनया देव आहेत.

रमेश देव यांच्या निधनाची बातमी अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. रमेश देव यांनी हिंदी, मराठी चित्रपटातून, मराठी नाटकांमधून रंगवलेला नायक खलनायक आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

तीन दिवसांपूर्वी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांनीही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. रमेश देव यांची अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख आहे.

त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापूर येथे झाला. जुन्या मराठी, हिंदी सिनेमात त्यांनी नायक, खलनायक रंगवला आहे. त्यांच्या पत्नी सीमा देव या देखील अभिनेत्री असून या दोघांनी जोडीने अनेक सिनेमामधून भूमिका केल्या आहेत. हृषीकेश मुखर्जी याच्या आनंद सिनेमात रंगवलेला डॉक्टर अनेकांच्या आजही स्मरणात आहे.

 

1956 साली रमेश देव यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. तर आरती हा त्यांचा हिंदीमधील पहिला चित्रपट होता. त्यांनी ‘या सुखांनो या’ या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे.

Share This News

Related Post

पुण्यातील RTO कार्यालयासमोर रिक्षा चालकांकडून चक्का जाम ! CNG चा दर कमी करण्याची मागणी

Posted by - August 8, 2022 0
पुणे : राज्यात सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. त्याचप्रमाणे सीएनजीचा दर प्रति किलो 91 रुपये झाला आहे. याचा फटका रिक्षा चालकांना बसत…
Sharad Pawar

Sharad Pawar : बैठकीत भावूक झालेल्या ‘त्या’ नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादमध्ये

Posted by - June 7, 2023 0
जाफराबाद : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) अनुषंगाने सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जाफराबादच्या…

नेते म्हणतात तयारीला लागा… कार्यकर्ते म्हणतात आधी तारखा तर सांगा !

Posted by - August 7, 2022 0
आज निवडणुका होतील, उद्या निवडणुका होतील म्हणून इच्छुक उमेदवार केव्हापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत मात्र निवडणुकांना मुहूर्त काही लागेना. तिकडं…

BIG NEWS : अहमदनगरच्या गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट; कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर केला निर्मनुष्य

Posted by - February 25, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई कारखान्याच्या डीसलेरी विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये कारखान्याचा मोठ्या…

अखेर 48 तासांनंतर कात्रज प्राणीसंग्रहालयातून पळालेला बिबट्या जेरबंद

Posted by - March 5, 2024 0
  कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला 48 तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलंय. या बिबट्याला जेर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *