एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दणका दिला- रामदास आठवले

166 0

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्यामुळे शिवसेनेचे आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आमदार नाराज होते. एकनाथ शिंदे आणि आणि अनेक आमदार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेनेने केलेल्या युतीवर नाराज होते. भाजप सोबत शिवसेनेने युती करावी अशी एकनाथ शिंदें आणि अनेक शिवसेना आमदारांची इच्छा होती. मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीचा चुकीचा निर्णय घेतला.

त्यातून एकनाथ शिंदे आणि अन्य शिवसेना आमदारांची नाराजी वाढत गेली. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दणका दिला असून महाविकास आघाडीचे सरकार लवकर कोसळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असून महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात गेले असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

Share This News

Related Post

solapur

पोटच्या मुलांचा खून करून आईची गळफास घेऊन आत्महत्या; असे नेमके काय घडले?

Posted by - May 5, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पती- पत्नींच्या भांडणात लहानग्या चिमुरड्याना आपला जीव गमवावा…

…..त्यामुळे शिंदे फडणवीसांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त आहेत -प्रकाश आंबेडकर

Posted by - July 30, 2022 0
पुणे:राज्यात एकनाथ शिंदे गटाचे सरकार आले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची नव्हती तरी. त्यांना उपमुख्यमंत्री…

तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ; सोलापुरात हलगीनाद करून आनंद साजरा

Posted by - August 9, 2022 0
मुंबई : अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे. आज भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांनी मंत्र पदाची शपथ घेतली आहे.…

JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवीन तारखा

Posted by - March 14, 2022 0
JEE ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.कोणत्या आहेत…

मिनी लोकसभेचा आज फैसला ; राजकीय प्रतिष्ठा पणाला

Posted by - March 10, 2022 0
राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *