TOP NEWS SPECIAL REPORT : लोकवर्गणीतून आमदार, खासदार झालेला लोकनेता ‘राजू शेट्टी’…!

457 0

TOP NEWS SPECIAL REPORT : राजू शेट्टी महाराष्ट्राच्या राजकारणातील विशेषतः शेतकरी चळवळीतील मोठं नाव आंदोलन असो वा मोर्चे राजू शेट्टी हे राज्याच्या राजकीय सारीपाटावर कायमच चर्चेत राहिलंय. एक चळवळीतील कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य आमदार ,खासदार ते आता पुन्हा शिवार नेमका कसा राहिला आहे राजू शेट्टी यांचा जीवनप्रवास ते पाहूयात…

राजू शेट्टी यांचा जन्म 1 जून 1967 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात झाला. शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी शेट्टी यांनी आजवर अनेक आंदोलन केली आहेत. राजू शेट्टी सुरुवातीला लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. जिल्हा परिषदेची मुदत संपण्यापूर्वीच शेट्टी शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यांनी राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला.

See the source image

पुढे 2009 च्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला. 2014 मध्येही राजू शेट्टी लोकसभेवर निवडून आले होते. विशेष म्हणजे या सर्व निवडणुका शेट्टी यांनी लोकवर्गणीतून लढवल्या आणि जिंकल्यादेखील.. मात्र 2019 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांच्यामुळे शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी चला उभा भूमिपुत्रांनो नवा एल्गार करू आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरू म्हणत आपली नवी संघर्षमयी राजकीय कारकीर्द शेतकऱ्यांसाठी सुरूच ठेवली.

See the source image

2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या भाजपा, शिवसेना व अन्य मित्रपक्षांसह झालेल्या महायुतीत शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील झाली होती. मात्र त्यानंतर महायुतीशी फारकत घेत शेट्टी महाविकास आघाडी मध्ये सामील झाले होते. मात्र 5 एप्रिल 2022 ला कोल्हापुरात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आणि एकला चलो रे चा नारा.

आज घडीला राज्याच्या राजकारणात राजू शेट्टी नावाचा एकमेव नेता आहे. जो शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख दुःखात अडीअडचणीला धावून जातोय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढतोय. शेवटी जाताजाता…
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची …!

– संकेत देशपांडे
रिपोर्टर,TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

Sharad Pawar

Sharad Pawar : ‘ते आणि उद्धव एकच…’, राज ठाकरेंच्या आरोपांवर शरद पवारांनी केला पलटवार

Posted by - March 13, 2024 0
नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार आतून एकच असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात…

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांनी चौकशी करणार – गृहमंत्री वळसे पाटील

Posted by - February 27, 2022 0
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला  यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. शासनाने फोन टॅपिंग…
Pratik Patil

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Posted by - April 10, 2024 0
सांगलीतून बंडखोरी करण्याच्या विचारात असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील (Pratik Patil) यांनी…
Burning Car

Burning Car : मुंबई-बंगळुरू महामार्गवर बर्निंग कारचा थरार; Video आला समोर

Posted by - July 15, 2023 0
पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पुनावळे या ठिकाणी आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास नागरिकांना बर्निंग कारचा (Burning Car)…

“माफी कितीदा मागायची ? आता यापुढे मी कोणाचं ऐकून घेणार नाही…!” गौतमी पाटील संतापली

Posted by - March 11, 2023 0
पिंपरी चिंचवड : गौतमी पाटीलने आपल्या नृत्यकौशल्यातून अनेक तरुणांची मनं घायाळ केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिने तिच्या नृत्यातून अश्लील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *