भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

396 0

नवी दिल्ली- भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत.

राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेतील. 14 मे 2022 रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण होईल. त्यांच्या जागी राजीव कुमार पदभार सांभाळतील. १५ मे २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर असणार आहे. घटनेनुसार मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत असतो. राजीव कुमार हे १९८४ च्या बॅचचे आयएस अधिकारी असून २ सप्टेंबर २०२० रोजी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

विधी मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलं असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केलं असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केलं आहे.

Share This News

Related Post

कोळसा संकटामुळे रेल्वेने पुढील 20 दिवस रद्द केल्या 1100 गाड्या

Posted by - May 5, 2022 0
नवी दिल्ली- एकीकडे कडक उन्हामुळे देशभरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर दुसरीकडे देशात कोळशाची प्रचंड प्रमाणात टंचाई निर्माण…

पुणेकर घेणार मेट्रो प्रवासाचा आनंद ! दिवसाला किती मेट्रो धावणार ? जाणून घ्या वेळापत्रक

Posted by - March 2, 2022 0
पुणे- महामेट्रोचे पुण्यात पहिल्या टप्यातील मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत…

मुंबईत देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू; जाणून घ्या काय आहे भाडेदर

Posted by - February 18, 2022 0
मुंबई- देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. बेलापूर ते मुंबई अशी ही…

धक्कादायक ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट

Posted by - February 18, 2022 0
मुंबई – सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे हिने एक खळबळजनक पोस्ट टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने आपल्या जिवाला…

पुणे : येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंगमध्ये करण्यात आला ‘हा’ बदल ; वाचा सविस्तर

Posted by - September 13, 2022 0
पुणे : येरवडा वाहतुक विभागाअंतर्गत कल्याणी व्हेज हॉटेल ते लेक्सीकन शाळा आणि एमएसईबी ऑफीस ते सायबेज कंपनी कॉर्नर, मारिगोल्ड सोसायटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *