दृष्टिक्षेपात राजस्थान ; सचिन पायलट ठरणार का राजस्थानचे एकनाथ शिंदे ?

254 0

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही ‘भारत जोडो’ यात्रा काँग्रेस साठी महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असताना तब्बल 24 वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी ची निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये गांधी परिवारातील एकही सदस्य रिंगणामध्ये नाही. या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि शशी थरुर हे अर्ज भरण्याची शक्यता असून G23 गटाचे मुकुल वासनिक आणि मनीष तिवारी यांच्याकडे देखील संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे.

मात्र एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा गेहलोत यांनी जाहीर करतानाच मी राजस्थानमध्ये ही कायम असेल असा दावा केल्यानं पक्षाचे अध्यक्षपद आणि मुख्यमंत्रिपद अशा दोन्ही बाजूंसाठी आपण सक्षम असल्याचं गेहलोत सांगत असले तरी मात्र, त्यांना राज्याचा मोह सोडावा लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

असं असतानाच आता मुख्यमंत्रीपदावरून राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून आतापर्यंत 92 आमदारांनी आपले राजीनामे राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी.जोशी यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. रविवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला जाण्यापूर्वी या 92 आमदारांनी आपले राजीनामे तो पूर्ण केले असून जर गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर गेहलोत गटाचाच मुख्यमंत्री व्हावा अशी या आमदारांची मागणी तर दुसरीकडे सचिन पायलट यांचे समर्थक आमदार त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत.

त्यामुळे आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अशोक गेहलोत यांच्यासमोर राजस्थान राखण्याचं मोठं आव्हान असून सचिन पायलट यांची नाराजी पाहता अडीच महिन्यापूर्वी महाराष्ट्रात जसा राजकीय भूकंप घडला तसा राजकीय भूकंप राजस्थानात घडून सचिन पायलट हे राजस्थानचे एकनाथ शिंदे ठरणार का ? हे पाहणं आता महत्तवाचं ठरणार आहे

– संकेत देशपांडे
रिपोर्टर TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

भीक मागण्यासाठी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक

Posted by - May 31, 2022 0
पुणे – भीक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळवण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलीचं पुण्यातून अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.…

राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ; 6 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

Posted by - April 24, 2022 0
सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत…

मोठी बातमी : राज्य महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस; दोन दिवसात खुलासा करण्याचे आदेश

Posted by - January 6, 2023 0
पुणे : उर्फी जावेद हीच्या व्हिडिओवरुण चित्रा वाघ या आक्रमक झाल्या होत्या. त्यावर रूपाली चाकणकर यांच्यासह महिला आयोगावर आरोप केला होता.…

MAHARASHTRA POLITICS : धनुष्यबाण चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात; धनुष्यबाण चिन्हाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

Posted by - December 12, 2022 0
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच अद्याप देखील सुटलेला नाही. आज शिवसेना आणि शिवसेनेच निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? यावर निवडणूक आयोगाच्या सुनावणीला…

डायरीतील मातोश्री माहिती नाहीत पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही – चंद्रकांत पाटील

Posted by - March 27, 2022 0
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *