‘त्या’ व्हाट्सअप मेसेजमुळे रजनी कुडाळकर आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

717 0

मुंबई- शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी काल , सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. आता या आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून त्यांच्या आत्महत्या करण्याला एक महिला जबाबदार असल्याचा एक मेसेज पोलीस तपासात पुढे आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

मंगेश कुडाळकरांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या करण्याआधी केलेल्या एका मेसेजमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्येआधी आपल्यामुलाला एक मेसेज केला होता. या मेसेजमध्ये रजनी कुडाळकर यांनी आपल्या आत्महत्येला एक महिला जबाबदार असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे.

या मेसेजमध्ये राजांनी कुडाळकर यांनी लिहिलेले आहे की, आपलं काही बरं वाईट झालं , तर त्याला जबाबदार संबंधित महिला असेल. त्या महिलेचे नाव देखील त्यांनी लिहिलेले आहे. हा मेसेज पोलिसांच्या हाती लागला असून मुंबई पोलिस या दिशेने चौकशी करत आहेत. ती महिला नेमकी कोण ? तिचा रजनी कुडाळकर यांच्याशी काय संबंध ? रजनी कुडाळकर यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास संबंधित महिलेने का भाग पाडले ? असे अनेक प्रश्न या या मेसेजमुळे उपस्थित झाले आहेत. दरम्यान, नेहरूनगर पोलिसांनी रजनी कुडाळकर यांच्या मुलाचाही जबाब नोंदवून घेतला आहे.

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी कुडाळकर यांनी मुंबईतील कुर्ला मधील नेहरूनगर येथील त्यांच्या निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. मंगेश कुडाळकर हे कुर्ला मतदारसंघाचे आमदार आहेत. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्यात काल रात्री ९.१५ ते ९.३० वाजताच्या सुमारास पोलिसांना फोन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रजनी कुडाळकर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

Share This News

Related Post

NIA

ISIS च्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला कोंढव्यातून अटक

Posted by - July 27, 2023 0
पुणे : NIA कडून पुण्यात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ISIS च्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला पुण्याच्या कोंढवा परिसरातून…

मोठी बातमी! बंडखोर आमदारांना सीआरपीएफचे जवान सुरक्षा पुरवणार

Posted by - June 26, 2022 0
बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या…
pune crime

‘त्या’ आयटी इंजिनियरची हत्या फक्त तीन हजार रुपयांसाठी; 24 तासात लागला छडा

Posted by - May 14, 2023 0
पुणे : शनिवारी वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी एका आयटी इंजिनियरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करत पोलिसांनी…
Milind Narvekar

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी दिली उमेदवारीची ऑफर?

Posted by - April 21, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती उद्धव ठाकरेंना अजून एक जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि…
jagdish Mulik

‘द केरळ स्टोरी’ राज्यात करमुक्त करावा; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

Posted by - May 10, 2023 0
पुणे : दिग्दर्शक सुदिप्तो सेन (Director Sudipto Sen) यांचा ‘द केरळ स्टोरी’ ( The Kerala Story) हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *