RAJ THACKREY : “शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने…!”, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

216 0

मुंबई : परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे . याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. “दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं ही नम्र विनंती. असे या पत्रात त्यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे.

प्रति,
सन्मा. श्री. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

सस्नेह जय महाराष्ट्र !

महोदय,
ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा.

सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि सध्या कोरडवाहू तसंच बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.

दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं ही नम्र विनंती.

आपला नम्र

राज ठाकरे

Share This News

Related Post

Pandharpur Blast

Pandharpur Blast : पंढरपूरमध्ये भीषण स्फोट; 1 किमी पर्यंतचा परिसर हादरला

Posted by - March 1, 2024 0
पंढरपूर : पंढरपूरमधून (Pandharpur Blast) एक मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरमधील सांगोला तालुक्यातील महूद गावात भीषण स्फोट झाला आहे.…
Satara Crime News

Satara Crime : एकाच कुटुंबातील चौघांचे आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात?

Posted by - July 21, 2023 0
सातारा : इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळल्याची घटना ताजी असताना आता सातारा जिल्ह्यातून (Satara Crime) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये…

#EXAMS : बारावी व दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश जारी

Posted by - February 14, 2023 0
पुणे : जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक परीक्षा व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ…

तीन मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यावर पुण्यात पाचशे कोटीचा; प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Posted by - October 31, 2022 0
पुणे : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…

‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ राज ठाकरेंनी अशी कुणावर केली टीका

Posted by - May 22, 2022 0
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत भोंग्यांसंदर्भातील विषय छेडला. जर मशिदींवर भोंगे लावले तर मशिदिंसमोर लाऊडस्पिकरवर हनुमान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *