देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन, भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन

315 0

मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. विधानमंडळाकडूनही विधानसभेच्या सर्व सदस्यांना उद्या होणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूला आले असल्यामुळे भाजपने ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.

त्यानंतर मुंबईत दाखल होऊन त्यांनी पक्षनेत्यांशी चर्चा केली. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार आशीष शेलार आदींचा समावेश असलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाने रात्री उशिरा राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली.

या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेत मनसेचा एक आमदार आहे. त्या आमदाराच्या पाठिंब्यासाठी फडणवीस यांनी राज यांना फोन केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत देखील मनसेच्या एका आमदाराने भाजपच्या बाजूने मतदान केले होते. उद्या गुरुवारी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मनसे भाजपच्या बाजूने मतदान करणार आहे असे समजते.

उद्या सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन

अखेर राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही. तसेच सभागृह तहकूब करता येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे, असा सूचनाही राज्यपालांनी पत्रात दिल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर इतर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती दिली आहे. ‘आम्ही सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत. आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील,’ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Share This News

Related Post

घरगुती गॅस पुन्हा महागला, एलपीजी सिलेंडर आता मिळणार ‘या’ किमतीला

Posted by - May 19, 2022 0
नवी दिल्ली- महागाईने देशात उच्चांक गाठला असून त्यामध्ये आता घरगुती गॅसच्या दरवाढीने भर पडली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडर 3 रुपये…
Washim news

वडिलांनी पोटच्या लेकराचीच केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Posted by - June 8, 2023 0
वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात एक बाप- लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका…
Manoj Jarange

Manoj Jarange : आंबेडकरांची निवडणूक लढवण्याची ऑफर, जरांगेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 28, 2024 0
जालना : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात (Manoj Jarange) महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला…
Weather Forecast

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यातील मतदान देशासह राज्याच्याही पाच मतदारसंघांमध्ये पार पडत आहे. यादरम्यान हवामान खात्याने (Weather Update)…

मराठवाड्याच्या ‘या’ 5 दिग्गज नेत्यांची ‘अकाली एक्झिट’ ; TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Posted by - August 18, 2022 0
मराठवाड्याच्या मातीनं केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीनं भुरळ पाडत जनमानसाचा आवाज बनलेले असंख्य नेते मराठवाड्यानं दिली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *