राज ठाकरे यांची पुण्यात ‘या’ दिवशी सभा, सभेच्या परवानगी बाबत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले

420 0

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांची पुण्यात सभा होणार असल्याचे बोलले जात होते. आता या सभेची तारीख ठरली असून २१ मे रोजी डेक्कन येथील नदीपात्रातील मैदानात राज ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेला पोलीस परवानगी देणार का, याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वक्तव्य केले आहे.

या सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मात्र, पोलीस या सभेसाठी परवानगी देणार की नाही, याबाबत साशंकता आहे. याविषयी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारणा करण्यात आली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

त्यावर गृहमंत्र्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचे कारण दिसत नाही. पोलीस आयुक्त या सभेला परवानगी देतील. मात्र, मनसेने पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे हे आजपासून पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

पुण्यातील भाजप-राष्ट्रवादी हाणामारीवर गृहमंत्री म्हणाले…

सोमवारी पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाच्या दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पोलीस योग्य ती कारवाई करतील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होतील. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करणे ही आक्षेपार्ह बाब आहे.

Share This News

Related Post

पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने ८८ आस्थापनांवर कारवाई

Posted by - November 10, 2022 0
पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित तपासणी मोहिमेत वजने व…

राज्यातील सत्ता संघर्षाची होणार LIVE सुनावणी ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Posted by - September 21, 2022 0
येत्या 27 सप्टेंबर पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सत्ता संघर्षावर होणाऱ्या घटनापिठासमोरील खटल्याची सुनावणी आता थेट पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा…

#crime : 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार ! दोघांच्याही कुटुंबीयांची चौकशी, मुलांचं बालपण हरवतंय ? याला जबाबदार नक्की कोण ?

Posted by - February 17, 2023 0
उरण : एक विचित्र घटना उरण मधून समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर 14 वर्षाच्या अल्पवयीन…
Top News Marathi Logo

Maharashtra Political Crises : “अब सभी को सभी से खतरा है…!” संजय राऊतांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *