राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना पुन्हा अपघात, १२ गाड्यांचे नुकसान

445 0

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या सभेसाठी औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या दिशेने येत असताना राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा पुन्हा एकदा अपघात झाला आहे. यामध्ये १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे आज दुपारी असाच अपघात घडला होता. त्यामध्ये दोन गाड्यांचे नुकसान झाले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा दुसरा अपघात घडला आहे. औरंगाबाद जवळील वाळूज येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात १२ गाड्यांच नुकसान झालं आहे. यामध्ये पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची गाडी देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी आज दुपारी अहमदनगर येथील घोडेगाव येथे तीन गाड्या एकमेकांना पाठीमागून धडकल्या होत्या ज्यात केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुकसान झाले होते. या दोन्ही अपघातात कुणी जखमी झाले नाही. वाळूज येथे घडलेल्या अपघातात एअर बॅग्समुळे कुणालाही दुखापत झाली नाही असं सांगण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : छ. संभाजीनगर हादरलं ! धक्का लागला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला

Posted by - November 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दुचाकीचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणातून…

#VIRAL VIDEO : व्हिडिओ पाहून अक्षरशः अंगावर काटा येईल; महिलेच्या तोंडातून डॉक्टरांनी काढला चार फुटाचा जिवंत साप

Posted by - March 6, 2023 0
सोशल मीडियावर रोजच चित्र विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये…

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात दाखल

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता…

हनुमान जयंतीच्या प्रसादातून ५० जणांना विषबाधा, दोघे गंभीर, नाशिक जिल्ह्यातील घटना

Posted by - April 8, 2023 0
हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिक सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव…

व्यक्तिगत हेवे – दावे काढण्याच्या हेतूने, ‘माध्यमां समोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणाऱ्यांवर’ काँग्रेस पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करावी – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

Posted by - January 18, 2023 0
पुणे : राज्यातील काही असंतुष्ट नेते, व्यक्तिगत राजकीय – अस्तित्वा साठी सत्यजित तांबे व मा हंडोरे प्रकरणीचे निमित्ताने व्यक्तिगत हेवे-दावे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *