भाजपा अंधेरी पोटनिवडणूक लढवणार नसल्यानं राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना आभार पत्र ,प्रिय मित्र देवेंद्रजी …

279 0

रमेश लटके यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपानं लढवू नये, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल रविवारी एका पत्राद्वारे केली होती. त्यानुसार आज भाजपानं मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला.

आपल्या विनंतीस मान देऊन भाजपानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आभाराचं पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या आभार पत्रात काय म्हटलंय ? पाहूयात…

श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

प्रिय मित्र देवेंद्रजी,

सस्नेह जय महाराष्ट्र !

काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी, असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार.

आपला मित्र,
राज ठाकरे

Share This News

Related Post

सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा 15 दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Posted by - February 16, 2023 0
पुणे : जिल्ह्यात २०२३ मधील सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी…
CM EKNATH SHINDE

CM Eknath Shinde : अजित पवारांच्या बंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण: पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे हजारो कार्यकर्ते आक्रमक

Posted by - December 11, 2022 0
चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. विचारांचा सामना…

ब्रेकिंग न्यूज ! ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी

Posted by - March 7, 2022 0
प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार घेणार असून सर्वपक्षीय बैठकीत निर्णयावर एकमत देण्यात आले. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ…

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार; शिंदे-भाजपा सरकारनं बहुमत चाचणी जिंकली

Posted by - July 4, 2022 0
विधानसभा अधिवेशनाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुर आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. शिवसेनेत बंड करत भाजपसोबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *