राहुल गांधी यांच्या वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार का ? काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त ?

763 0

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे वायनाड या त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली आहे.

आज, कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करताना निवडणूक आयोगानं चार विधानसभा जागांसाठी आणि एका लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. परंतु, वायनाड जागेसाठी निवडणूक जाहीर केली नाही. वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यासाठी आमच्याकडं 6 महिन्यांचा कालावधी आहे. आताच आम्ही घाई करणार नाही. त्यांच्याकडं अपील करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे.’ असं राजीव कुमार म्हणाले.

राहुल गांधींनी कर्नाटकात भाषणादरम्यान ‘मोदी’ आडनावावर भाष्य केलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये गुजरातमधील सुरत येथील भाजप आमदारानं त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. शुक्रवार, 24 मार्च रोजी सुरत कोर्टानं राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

Share This News

Related Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण

Posted by - May 5, 2022 0
मुंबई-राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा…

VIDEO : ‘परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच’…! – सुषमा अंधारे 

Posted by - September 20, 2022 0
पुणे : शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटही पुढे सरसावला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा…

मतदान करावे म्हणून अनोखी शक्कल ! मतदानाची शाई दाखवा आणि मोफत चहा किंवा पुस्तक मिळवा; महिलांसाठी मोफत मेहंदी देखील काढून मिळणार

Posted by - February 26, 2023 0
पुणे : तिथे काय उणे याची प्रचिती आज पुण्यामध्ये आली आहे. मतदान करण्यासाठी मतदारांनी घराबाहेर पडावं यासाठी उमेदवाराच्या समर्थकांनी अनोखा…
Stones Pelted

Stones Pelted : धक्कदायक! समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

Posted by - June 18, 2023 0
वाशिम : वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरात समृद्धी महामार्गावर सात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *