राहुल गांधी आज देणार तुरुंगवासाच्या शिक्षेला आव्हान, स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता

443 0

‘सर्व चोरांची आडनावे मोदी कशी असतात?’ या 2019 मधील विधानावरून दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या निकालानंतर दहा दिवसांनी राहुल गांधी आज सोमवारी सुरत सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत. अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.

राहुल यांनी २०१९ मध्ये कर्नाटकातील कोलार येथे एका जाहीर सभेत मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीनंतर भाजपच्या पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध सुरतच्या सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. चार वर्षानंतर २३ मार्च रोजी सुरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच वेळी राहुल यांना जामीन मंजूर करण्यात आला होता आणि शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी ते स्वत: आज सत्र न्यायालयात उपस्थित राहतील.

खासदारकी रद्द झाल्याने राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवर राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अदानींशी काय नाते आहे? 20 हजार कोटी रुपये कोणाचे?, असे प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधानांना प्रश्न विचारून खूप दिवस झाले. त्याचे उत्तर दिले नाही म्हणून आज परत प्रश्न विचारत आहे, असेही राहुल यांनी पुढे नमूद केले.

Share This News

Related Post

Vaibhav Shinde

Pune Suicide News : धक्कादायक ! सुसाईड नोट मध्ये भावाकडे शेवटची इच्छा व्यक्त करीत पुण्यात पोलिसाची आत्महत्या

Posted by - July 7, 2023 0
पुणे : पो. अंमलदार श्री. वैभव शिंदे, (रा. लोहगाव,खेसे काॅलनी पुणे) यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Pune Suicide…
Uddhav Thackeray

Breaking News मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ५ वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप झाला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळणार का अशी शंका व्यक्त…

यंदाच्या वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष अत्याधुनिक सोयीसुविधा; महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

Posted by - June 19, 2022 0
आगामी पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा…

#BULDHANA : पतीच्या विरुद्ध असलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा म्हणून पत्नीचे शोले स्टाईल आंदोलन, बुलढाण्यात चर्चेचा विषय

Posted by - March 10, 2023 0
BULDHANA : पतीवर दाखल झालेला खोटा गुन्हा पोलिसांनी मागे घ्या आणि पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी करत महिला थेट…
Omraje

घातपात की अपघात? ओमराजे अपघातातून थोडक्यात बचावले

Posted by - June 10, 2023 0
धाराशिव : धाराशिवमधून (Dharashiva) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर टिप्परच्या धडकेतून थोडक्यात बचावले आहेत. भरधाव टिप्पर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *