‘श्रीं’च्या निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज ! 8 हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह 1200 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

281 0

पुणे : उद्या शुक्रवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज झाली असून गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पुणे पोलिसांकडून संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज दिली.

शुक्रवारी सकाळपासून 8000 पोलिस कर्मचार्‍यांच्या तैनातीचं नियोजन करण्यात आलं असून त्याचं नेतृत्व पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली केलं जाणार आहे. चार अतिरिक्त आयुक्त, 10 उपायुक्त, 23 हून अधिक सहायक आयुक्त आणि 138 पोलिस निरीक्षक यांच्यासह सुमारे 625 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच 7500 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.

शहरात पाळत ठेवण्यासाठी 1200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून गणेश विसर्जनाच्या महत्त्वाच्या मिरवणुकीच्या मार्गांवरही अनेक अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, असंही अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.

पुण्याच्या मध्यवर्ती भागातील विविध रस्ते जे मुख्य मिरवणुकीचा भाग आहेत ते रस्ते मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार असून अन्य मार्गे वाहतूक वळवण्यात येणार आहे. उद्या पुण्यातील कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील आणि कोणत्या मार्गे वाहतूक वळवली जाईल याबाबत पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी माहिती दिली.

शहरातील विविध ठिकाणी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या स्टँडबाय ठेवण्यात येणार आहेत शिवाय शहरात ठिकठिकाणी वॉच टॉवर देखील उभारण्यात येणार आहेत. उद्या 2969 सार्वजनिक गणपती तसेच 2 लाख 22 हजार 977 घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे.

Share This News

Related Post

Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 12, 2024 0
पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला हिसंक वळण; यवतमाळमध्ये बस पेटवली

Posted by - October 28, 2023 0
यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा चौथा…

शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत, संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

Posted by - April 9, 2022 0
मुंबई- शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत, असा दावा करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना सोलापुरात पहिला धक्का! ठाकरे गटाच्या ‘त्या’ निर्णयामुळे शिवसैनिक नाराज?

Posted by - October 22, 2023 0
सोलापूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का बसला…

पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *