पुण्याचा अभिजीत कटके हिंदकेसरी ! हरियाणाच्या सोनूवीरला अस्मान दाखवत महाराष्ट्राच्या पठ्ठयानं मारलं मैदान !

2967 0

पुणे : भारतीय कुस्तीत सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पुण्याचा पहिलवान अभिजीत कटके यानं पटकावला. हरियाणाच्या सोनूवीरवर ५-० अशी एकतर्फी मात करत या पठ्ठ्यानं मैदान मारलं.

अभिजीत कटके ठरला 42वा महाराष्ट्र केसरी

भारतीय शैली कुस्ती महासंघाकडून 5 ते 8 जानेवारी या कालावधीत हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय 51 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटके यानं हिंदकेसरीचा किताब जिंकत मानाची गदा पटकावली. या स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी देखील सहभागी झाला होता परंतु उपांत्य फेरीत त्याचा पराभव झाल्यानं महाराष्ट्राची सारी मदार अभिजीतवर होती.

हरयाणाच्या मल्लांचं कुस्तीतलं वर्चस्व पाहता हिंदकेसरीची गदा हरियाणाकडं जाते की काय अशी शंका वर्तवली जात असताना अभिजीतनं सर्व अंदाज चुकीचे ठरवत अंतिम सामन्यात हरियाणाच्या सोनूवीरचा पराभव करत तो हिंदकेसरी ठरला.

अभिजीत कटके ठरला महाराष्ट्र केसरी, पटकावली चांदीची मानाची गदा ...

हिंद केसरीची मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा हवेली तालुक्याचा ढाण्या वाघ आणि वाघोली गावचा सुपुत्र पहिलवान अभिजीत कटके याच्या विजयानंतर महाराष्ट्रासह पुण्यात एकच जल्लोष झाला !

Share This News

Related Post

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : कसबा मतदार संघातील मतमोजणी थांबवली; काँग्रेस नेत्यांनी घेतला आक्षेप

Posted by - June 4, 2024 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कसबा मतदार संघातील मतमोजणी काही काळ थांबण्यात आली आहे.…

नव्या प्रभाग रचनेमध्ये तोडफोड झाल्यास अनेक विद्यमान नगरसेवकांना बसणार फटका

Posted by - February 1, 2022 0
पुणे- आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांचा समावेश आणि अस्तित्वातील…

दोन वर्षानंतर प्रथमच बारावी बोर्डची ऑफलाईन परीक्षा

Posted by - March 4, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9,635 परीक्षा केंद्रावर…

मोठी बातमी : मोहसीन शेख हत्या प्रकरणातील हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि 20 आरोपींची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - January 27, 2023 0
पुणे : 2014 साली घडलेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणातील हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि 20 आरोपींची निर्दोष मुक्तता…

पावसाळी अधिवेशन : औरंगाबाद उस्मानाबाद आणि नवी मुंबई नामांतराचा ठराव मंजूर

Posted by - August 25, 2022 0
पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे . दरम्यान एकीकडे आंदोलने , आरोप प्रत्यारोप होत असताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *