मोठी कारवाई : पुणेकर खात होते भेसळयुक्त तूप ? अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने भेसळयुक्त तुप बनविणाऱ्या विरुद्ध कारवाई

301 0

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींग मधील गोदाम जवळील पेढीवर धाड टाकून २२ हजार रुपये किमतीचे ८८ किलो भेसळयुक्त तुप व ११ हजार ९६ रुपये किमतीचे ७३ किलो वनस्पती असा एकुण रुपये ३३ हजार ९६ चा साठा जप्त करण्यात आला आहे.

भेसळयुक्त पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी विक्रेत्याविरुद्ध तपासणीमध्ये आढळुन आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने तडजोड अर्ज दाखल करुन रुपये १० हजार तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदा कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनुसार पुढील कारवाई घेण्यात येईल.

सह आयुक्त (अन्न) संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) रमाकांत कुलकर्णी व अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी ही कारवाई केली.

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये 5G सेवेचे अनावरण

Posted by - October 1, 2022 0
नवी दिल्ली : इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) मध्ये 5G ची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर बटण…

महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या प्रयत्नांना यश,परिचारीकांच्या कंत्राटीभरतीला शासनाची स्थगिती

Posted by - November 20, 2022 0
राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाने १३ एप्रिल २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करुन राज्यातील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारीका संवर्गासह , विविध…

#CHINCHWAD : पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट; चिंचवडमध्ये होणार तिरंगी लढत, अपक्ष राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा !

Posted by - February 16, 2023 0
चिंचवड : वंचित बहुजन आघाडीने एक पत्रक जाहीर करून पोट निवडणुकीसाठीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित ने चिंचवडमध्ये अपक्ष…
Pune Crime

Pune Crime : डीवाय पाटील कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला

Posted by - May 9, 2024 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *