पुणेकरांनो ! ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री पुण्यात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त ; हुल्लडबाजांनी सावध राहा

271 0

पुणे : कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी यंदा नववर्षाचे स्वागत उत्साहात करता येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर राहणार आहे. शहरात ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री सुमारे 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर तैनात असणार आहे.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध रेस्टॉरंट आणि खासगी रिसॉर्टमध्ये अनेकांनी पार्टी आणि सेलिब्रेशनच
नियोजन केलं आहे. शहरात पोलिसांकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात कारवाई करण्यात येणार असल्यानं वाहनचालकांना शुद्धीतच वाहन चालवाव लागणार आहे. याशिवाय 31 डिसेंबरच्या रात्री दहानंतर डेक्कन परिसरातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, आणि जंगली महाराज रस्ता तसेच कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क आणि विमाननगर या ठिकाणी गर्दी उसळते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी नियोजन केलं असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री विविध भागांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात येणार आहे. नागरिकांना आक्षेपार्ह घटना अथवा काही संशय असल्यास 26126296 किंवा 8975953100 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Share This News

Related Post

जालन्यात सापडलं 390 कोटींचं घबाड; 58 कोटींची रोख रक्कम प्राप्तिकर विभागाकडून जप्त

Posted by - August 11, 2022 0
जालना: शहरातील एका स्टील कारखानदारांवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला असून तब्बल 390 कोटी रुपयांचं घबाड जप्त करण्यात आलं आहे.…
Pune FTII

Pune FTII : पुण्यातील FTII मध्ये राडा ! वादग्रस्त बॅनर झळकावल्याने हिंदुत्ववादी संघटनेकडून विद्यार्थ्यांना मारहाण

Posted by - January 23, 2024 0
पुणे : पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात FTII ही संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. FTII मधील…

नेतृत्व विकासातून महिला सक्षमीकरणाचा आलेख वाढेल – माजी निवडणुक आयुक्त व्ही.एस. संपत 

Posted by - April 24, 2022 0
महिलांमधील सुप्त गुण जागृत करून त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे प्रचंड नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते विकसित केल्यास…

#BJP : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी हेमंत रसाने यांना जाहीर !

Posted by - February 4, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाची भाजपची उमेदवारी आज जाहीर झाली असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5 हजार कुटुंबांची दिवाळी गोड

Posted by - October 20, 2022 0
पुणे : कोथरुडमधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे नाममात्र दरात केवळ ₹१००/- प्रति किलो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *