पुणे ते कात्रज रस्ता (जुना कात्रज घाट रस्ता) एकेरी वाहतूक करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

316 0

पुणे : पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. ३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करुन वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

जुना कात्रज घाट रस्त्याच्या कि.मी. २२/०० ते २०/२०० या लांबीत डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करुन साताराकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

पुणे मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व गृह विभागाचे १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत.

Share This News

Related Post

पुण्यात फिल्मी थरार ! मैत्रिणीशी बोलतो म्हणून पठाणचा नुमविमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

Posted by - January 31, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये आज फिल्मी सीनला शोभेल असे चित्र पाहायला मिळाले. अल्पवयीन मुलाने आज नुमवी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला…

तुमच्यातल्या ‘या’ पाच सवयी तुम्हाला असफल होण्यास कारणीभूत ठरत आहे; आजच विचार करा !

Posted by - January 21, 2023 0
अनेक वेळा पण प्रचंड मेहनत करत असतो पण तरीही यश पदरी पडत नाही. हातातोंडाशी आलेला घास निघून जातो, मग आपण…
Eknath Shinde Call

स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन कटिबध्द 

Posted by - August 20, 2023 0
मुंबई: राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील…

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा; सिसोदिया म्हणाले…..

Posted by - August 19, 2022 0
नवी दिल्ली: सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित 21 ठिकाणी छापेमारी केली…
Devendra VS Uddhav

Devendra Fadnavis : आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर…. फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Posted by - June 24, 2023 0
बिहारची राजधानी पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *