पुणे : विजय दिवसाच्या स्मरणार्थ ‘सदर्न कमांड विजय रन’ चे आयोजन

152 0

पुणे : 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त, सात राज्यांमध्ये पसरलेल्या भारतीय सैन्याच्या सदर्न कमांड क्षेत्रात 18 प्रमुख ठिकाणी ‘सदर्न स्टार विजय रन’ आज आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरातील 50,000 हून अधिक सदस्यांसह, स्त्रिया आणि शाळकरी मुलांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. या रनमध्ये सर्वजण खांद्याला खांदा लावून आणि आपल्या फौजी बंधूंशी जुळवून घेत सामील झाले होते. ‘सैनिकांसाठी धावा, सैनिकांसह धावा’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.

पुणे येथे , 4000 हून अधिक उत्साही सहभागींसह पुणे रेसकोर्सच्या निसर्गरम्य वातावरणातून या रनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 12.5 किमी (खुली श्रेणी), 5 किमी (मुले) आणि 4 किमी (महिला) या तीन श्रेणीतील दौडला लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम यांनी झेंडा दाखवून रवाना केले. विविध 18 ठिकाणी जनसमुदायाला संबोधित करताना, आर्मी कमांडर यांनी 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाच्या आठवणी जागवल्या , तसेच भारतीय सैन्याची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी कमांड असलेल्या सदर्न कमांडद्वारे केलेल्या इतर प्रसिद्ध ऑपरेशन्सची आणि जुनागढ, गोवा आणि हैदराबाद संस्थानांना भारतीय गणराज्यात विलीन करताना बजावलेल्या कामगीरीची आठवण करून दिली. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा पाठपुरावा करून ते साध्य करण्याचे आवाहनही त्यांनी युवकांना केले.

सदर्न कमांडच्या तुकड्या आणि शाळकरी मुलांनी कार्यक्रमात पेश केलेल्या केलेल्या सांस्कृतिक सादरीकरणाने रेसकोर्स येथील कार्यक्रमाच्या उत्सवी वातावरण भर घातली. या सादरीकरणात भांगडा आणि लेझिम शो, पाईप बँड डिस्प्ले, एरोबिक्स आणि योगा, झुंबा डान्स, आर्मी पब्लिक स्कूलचे मराठी नृत्य सादरीकरण यांचा समावेश होता.

‘विजय रन’ मधील विजेत्यांना आर्मी कमांडरच्या हस्ते 42,000/- रुपये, 18,000/- रुपये आणि 18,000/- रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ‘सदर्न स्टार विजय रन’ हे दक्षिण कमांडद्वारे पुढील महिन्यात आर्मी डे परेड सेलिब्रेशन निमित्त नियोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेचा भाग आहे. आर्मी डे परेड 15 जानेवारी 2023 रोजी बेंगळुरू येथे होत आहे, आणि यानिमित्ताने दक्षिण भारतातील शूर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाईल.

Share This News

Related Post

Shrikrishna Panse

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Posted by - January 8, 2024 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (University of Pune) लोकपाल पदी प्रा.(डॉ). सुरेश गोसावी यांनी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची…

‘त्या’ व्हाट्सअप मेसेजमुळे रजनी कुडाळकर आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

Posted by - April 19, 2022 0
मुंबई- शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी काल , सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.…
Pune Death

पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले; Video आला समोर

Posted by - May 29, 2023 0
पुणे : पुण्याच्या कर्वेनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकीस्वाराने एका महिलेला उडवले. ही…
Pune News

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Posted by - February 27, 2024 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातून (Pune News) मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता मोठा दारुसाठा जप्त…
Mukesh Ambani

Mukesh Ambani : खळबळजनक ! मुकेश अंबानींना आला धमकीचा ई-मेल; म्हणाले ‘आम्हाला 20 कोटी द्या, अन्यथा…’

Posted by - October 28, 2023 0
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना ई-मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे उद्योग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *