#PUNE : शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात 300 खाटांच्या मेडिकव्हर रुग्णालयाचं उदघाटन

886 0

तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी दैनंदिन आरोग्य सेवा पुरविण्याचं काम डाँक्टर करत असतो – शरद पवार

पुणे : मेडिकव्हर रुग्णालयातफेँ पुण्यातील भोसरीमध्ये ३०० खाटांचे नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
या रुग्णालयाचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या उदघाटन प्रसंगी पवार यांनी पुण्यातील आरोग्यसेवेचे महत्त्व आणि समाजातील सर्व घटकांसाठी उपलब्धता यावर प्रकाश टाकला.

या रुग्णालयाद्वारे लोकांना दजेँदार आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहे. मेडिकव्हर ग्रुपचे संपूर्ण भारतात एकूण २४ रुग्णालये आहेत. रुग्णालयाच्या शुभारंभ प्रसंगी केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, खासदार श्रीरंग बारणे, मेडिकव्हर ग्रुपचे ग्लोबल अध्यक्ष फेड्रिक स्टेनमो, मेडिकव्हर रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अनिल कृष्णा,भारती विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, मेडिकव्हर रुग्णालयाचे कार्यकारी निदेशक पी. हरिकृष्ण आणि केएलई सोसायटी चा अध्यक्ष महंतेश एस कौजलगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

मेडिकव्हर ग्रुपचे ग्लोबल अध्यक्ष फेड्रीक स्टेनमो म्हणाले की, जगभरात मेडिकव्हर रूग्णालयातर्फे लोकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात काम करण्यात येत आहे. मेडिकव्हर रूग्णालयात मिळत असलेल्या दर्जेदार वैद्यकीय सुविधांवर लोकांचा विश्वास आहे, हेच आमचे यश आहे. भारतातील विविध तीन राज्यात मेडिकवर रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मेडिकव्हरचे सध्या २४ रूग्णालये असून यात पाच हजार खाटांची सुविधा आहे. देशभरात मेडिकव्हर रूग्णालयाचा विस्तार करणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. उत्तम वैद्यकीय उपचार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सर्व सुविधा भारतीयांना पुरविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

महाराष्ट्रातील विविध शहरात मेडिकव्हर रूग्णालयाची स्थापना करण्यात येत आहेत. पुण्यातील मेडिकव्हर रूग्णालयाची सुरूवात करण्यात आली असून या सुपर मल्टिस्पेशालिटी रूग्णालयात कॅथलॅब स्त्रीरोगतज्ज्ञ, न्युरो मायक्रो सर्जरी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, व्हक्युलर सर्जन, गॅस्ट्रोलॉजिस्ट, हृदयविकार असे विविध विभाग उपलब्ध करून दिले आहेत. एकाच खाटांसाठी रूग्णांना सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय भारतातील ग्रामीण भागात ४० हजारहून अधिक मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत भारतात ५० रूग्णालये स्थापना करण्याचे मेडिकव्हर ग्रुपचे उद्दिष्ट आहे. यात १०,००० खाटांची संख्या असणार आहे. आणि २५ हजार कर्मचारी कार्यरत असतील.

राष्ट्रवादी कॉग्रसे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी दैनंदिन आरोग्य सेवा पुरविण्याचं काम डाँक्टर करत असतो. मेडिकवर रुग्णालयात रूग्णांना उत्तमप्रतिची वैद्यकीय सुविधा पुरविण्याचं काम करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात रूग्णाचा विश्वास मिळवणं, हे खूप महत्त्वाचं आहे. रूग्णावर उत्तम उपचार देणं आणि विश्वास देणं हे डॉक्टरांचे वैशिष्ट्य आहे. लोकांचा या संस्थेवर विश्वास आहे. कारण ही संस्था सर्वसामान्य लोकांचा विश्वास प्राप्त करण्यात यशस्वी ठरली आहे. आता पुण्यात या संस्थेनं आपले नवीन रूग्णालय सुरू केले आहे. रूग्णालयातर्फे या भागातील लोकांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संस्थेनं नवीन शाखा सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. ही संस्था चालवत असताना काही प्रश्न व अडचण येत असल्यास आमचे सर्व सहकारी तुमच्या सोबत असतील.

मेडिकव्हर रुग्णालयाचे अध्यक्ष आणि वैद्यकिय संचालक डॉ. अनिल कृष्णा म्हणाले की, पुण्यात मेडिकव्हर रूग्णालयाचे उद्घाटन केल्याबद्दल मी श्री शरद पवार यांचे आभार मानतो. या व्यतिरिक्त या सुविधांच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल पुण्यातील खासदार, आमदार, डॉक्टर आणि परिचारिकांचा मी धन्यवाद करतो. मेडिकव्हर रूग्णालयाने आपला सात वर्षांचा यशस्वी टप्पा पार केला आहे. आतापर्यंत देशभरात मेडीकव्हर ग्रुपचे २४ रूग्णालय असून सर्वत्र या वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तळागाळातील नागरिकांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सोयीसुविधा पुरविणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या पुणे, नवी मुंबई, नाशिक, औऱंगाबाद और संगमनेर याठिकाणी पाच रूग्णालये कार्यरत आहेत.

केएलई सोसायटी चे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, म्हणाले, “आम्ही वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी कटिबद्ध आहोत ज्यांना त्यांची जात, धर्म किंवा सामाजिक पदानुक्रम विचारात न घेता, ज्यांना त्यांची आवश्यकता आहे अशा सर्वांना त्या मिळू शकतात. आम्‍ही समजतो की आर्थिक किंवा सामाजिक स्थितीच्‍या मर्यादांमुळे वैद्यकीय सेवा कमी किंवा मर्यादित करू नये, परंतु सर्वसामान्य जनतेला त्यात प्रवेश असायला हवा”

Share This News

Related Post

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

Posted by - May 15, 2022 0
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. क्विन्सलॅण्डमधील…

JIO TV च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारं ‘TOP NEWS मराठी’ ठरलं देशातलं पहिलं डिजिटल चॅनेल !

Posted by - March 25, 2022 0
पुणे- अल्पावधीतच लाखो दर्शकांच्या पसंतीस उतरलेल्या TOP NEWS मराठी डिजिटल चॅनलनं आता Jio tv च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश करून आपल्या…

6 डिसेंबरचा सूर्योदय आणि निळ्या सूर्याचा अस्त! डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

Posted by - December 6, 2022 0
6 डिसेंबर 1956… या दिवसाची सकाळ उजाडली ती निळ्या सूर्याच्या अस्तानं ! महामानव, भारतरत्न, बोधिसत्व आणि दलित-शोषितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब…

अमूलने वाहिली बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली

Posted by - February 17, 2022 0
  गोल्डन मॅन अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले आहे. https://www.instagram.com/p/CaCpJDSvJD0/?utm_source=ig_web_button_share_sheet राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून…

Breaking News शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांवर ईडीची सर्वात मोठी कारवाई

Posted by - June 24, 2022 0
जालना – शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. खोतकर यांच्याशी संबंधित तब्बल ७८ कोटी ८० लाखांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *