नवऱ्याची पुणे पोलिसांकडे अजब तक्रार, पुणे पोलीस आयुक्तांनी दिला मोलाचा सल्ला

496 0

पुणे- आजकाल व्हाट्स अप हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. व्हाट्स अपवर काहीजण तासातासाला डीपी बदलतात तर काहींचा डीपी वर्षानुवर्षे तोच असतो. याच डीपी ठेवण्यावरून नवरा बायकोमध्ये वाद होतात. असाच एक वाद पोलिसांकडे पोहोचला आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या नवरोबाना अतिशय मोलाचा सल्ला दिला.

जनजागृतीचा भाग म्हणून नुकताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरुन लाइव्ह वीथ सीपी पुणे सीटी या अंतर्गत सर्वसामान्यांशी ट्विटरवरुन संवाद साधला. यादरम्यान अनेकांनी वेगवगेळे प्रश्न गुप्ता यांना विचारले. याच उपक्रमात पुण्यातील प्रतीक कारंजे नावाच्या तरुणाने पोलिसांकडे अजब तक्रार केली आहे. माझ्या सोबतचा फोटो व्हाट्स अप वर डीपी म्हणून का ठेवत नाही या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण होत आहे. यासाठी मी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलची मदत घेऊ शकतो का?”, असं प्रतीक यांनी ट्विटर अकाउंटवरून पोलिसांना विचारले.

https://twitter.com/pratikdkaranje/status/1523575925946093568

त्याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरून मोलाचा सल्ला दिला आहे. पोलीस आयुक्तांनी प्रतीकच्या प्रश्नावर उत्तर दिले की, नेहमी एकमेकांवर भरोसा ठेवं हे कायम चांगलं असतं. बाकी इतर घरगुती हिंसाचारासंदर्भातील तक्रारींसाठी तुम्ही कोणत्याही वेळी भरोसा सेलशी संपर्क करु शकता”

Share This News

Related Post

यासिन मलिक याला फाशी की जन्मठेप ? आज दुपारी होणार निर्णय

Posted by - May 25, 2022 0
नवी दिल्ली- काश्मिरी फुटरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता त्याच्या शिक्षेबाबत…

प्रभागरचनेच्या हरकतींच्या सुनावणीसाठी एस. चोक्कलिंगम यांची नियुक्ती

Posted by - February 4, 2022 0
पुणे- पुणे महानगरपालिकेच्या जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी निवडणूक आयोगाने यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी…

Maharashtra Politics : OBC समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे ,यासाठी आम्ही प्रयत्न केले…! – जयंत पाटील

Posted by - July 20, 2022 0
मुंबई : आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील स्थानिक…

रवींद्र धंगेकरांचा ऐतिहासिक विजय : भाजपच्या बालेकिल्ल्यात धंगेकरांचा सुरुंग; ३० वर्षांनी भाजपचा पारंपारिक मतदारसंघ हिरावला !

Posted by - March 2, 2023 0
पुणे : भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेल्या कसबा पोटनिवडणुकीतून धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजपला आता मोठी हार पत्करावी लागत असून अख्ख…
Narendra Modi

PM Modi : हिमाचलमधील लेपचा येथे पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी

Posted by - November 12, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठ वर्षांप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *