Breaking news ! पुणे विमानतळावर बनावट तिकिटे दाखवून दोन जणांचा घुसखोरीचा प्रयत्न

163 0

पुणे- जयपूरला जाणाऱ्या विमानाची बनावट तिकिटे दाखवून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुणे विमानतळावर उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या निमित्ताने विमानतळावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गौतम शिंदे आणि मोहम्मद देसाई अशी या दोघांची नावे आहेत. यापैकी एकजण उडन टेकडी भागात राहतो. तर दुसरा कोंढवा भागात राहतो. दोघेही एअर एशियन विमान कंपनीच्या विमानातून जयपूरकडे जात होते.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. आरोपींकडे बनावट तिकीटे होती. ते जयपूरला जाणार होते. पण सुरक्षा यंत्रणांच्या वेळीच लक्षात आले. त्यांची झडती घेतली असता आरोपींकडे बनावट तिकीटे आढळून आली. आरोपींचा यामागे नेमका काय उद्देश होता ते अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

Share This News

Related Post

Pune FTII

Pune FTII : पुण्यातील FTII मध्ये राडा ! वादग्रस्त बॅनर झळकावल्याने हिंदुत्ववादी संघटनेकडून विद्यार्थ्यांना मारहाण

Posted by - January 23, 2024 0
पुणे : पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात FTII ही संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. FTII मधील…
Police

Pune loksabha Election : पुण्यातील कोरेगाव पार्क येथे वाहतुकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर

Posted by - June 4, 2024 0
पुणे : पुण्यात आज चार लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी पार पडणार असून सकाळी ८ पासून मतमोजनी सुरू झाली आहे. या…

मोठी बातमी : कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघ पोटनिवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला होणार मतदान, वाचा सविस्तर

Posted by - January 18, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्हीही पोटनिवडणुकींसाठी येत्या 27 फेब्रुवारीला…

“या घटना अशा मुलींसोबत होत आहेत, ज्या चांगल्या शिकलेल्या आहेत…!” श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

Posted by - November 18, 2022 0
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने निघृण हत्या केली. तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला…

पुणे महापालिकेची धडक कारवाई, थकबाकी असलेली 59 दुकाने केली सील

Posted by - May 7, 2022 0
पुणे – पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. आता महानगरपालिकेने सुमारे आठवडाभरात थकबाकी वसुलीसाठी व्यावसायिक हेतूने भाडेतत्त्वावर दिलेली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *