पुणे नवरात्रौ महिला महोत्सव 2022 : “महिला महोत्सव हा स्त्री शक्तीचा जागर” : सुहासिनी देशपांडे

276 0

पुणे : महिला महोत्सव हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्त्री शक्तीचा जागर असून असा उप्रक्रम सातत्याने 22 वर्षे आयोजित करणे ही बाब अभिनंदनीय आहे.अशा शब्दात ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे कौतुक केले.

यंदा 22 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उदघाटन  त्यांच्या हस्ते झाले,त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी  महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक ,अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, निर्मला जगताप ,योगिता निकम मा.नगरसेविका सुजाता शेट्टी,लता राजगुरू,वैशाली मराठे,अमित बागुल,हेमंत बागुल,हर्षदा बागुल, सोनम बागुल,दीपा बागुल,छाया कातुरे,श्रुतिका बागुल,संगीता बागुल  आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, मॉडेलिंग ग्रुमिंगतज्ञ जुई सुहास आणि सह्याद्री क्रांती मळेगावकर यांना पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा मानाचा ‘तेजस्विनी‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ५०००  रु. रोख, देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह,  शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी सुहासिनी देशपांडे यांनी आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या निःस्वार्थ सेवा कार्याचे कौतुकही केले .त्या म्हणाल्या की, बागुल दांपत्याने समाजकार्याचे व्रत अंगीकारले असून ते अविरतपणे जपत आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने वाव देणारे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.  विविध  क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत आणि त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिलांचा सन्मान या व्यासपीठावर होतो हीच महत्त्वाची बाब आहे.अशा शब्दात अनुराधा मराठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अन्य पुरस्कारार्थी मॉडलिंग मार्गदर्शक जुई सुहास आणि सह्याद्री क्रांती मळेगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल म्हणाल्या की, कष्टकरी महिलांना काही क्षण विरूंगळा मिळावा या उद्देशाने हा महोत्सव सुरू आहे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा आणि उपक्रमांची माहिती दिली. विशेषत: स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी कन्या पूजनाचा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. महिलांच्या महाआरतीतून स्त्री शक्तीचा जागर केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.पुणे

नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक ,अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. ती आई ,बहीण, पत्नी या रूपात असते. महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते असे नमूद करून आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.असे ते म्हणाले.

यावेळी स्केटिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रुतिका सरोदे व वैदेही सरोदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे प्रारंभी सँडी ग्रुपच्या कलाकारांनी देवीचा गोंधळ सादर केला. प्रभा सरोदे यांच्या शंखनादाने महोत्सवाची उद्घोषणा करण्यात आली. सूत्रसंचालन कीर्ती रामदासी यांनी केले तर आभार महोत्सवाच्या उपाध्यक्षा  निर्मला जगताप यांनी मानले.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या उद्घाटन  व तेजस्विनी पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर भाग्यलक्ष्मी स्पर्धा अंतर्गत होम मिनिस्टर  स्पर्धाही  यावेळी पार पडल्या.

Share This News

Related Post

मुंबई : बीकेसी मैदानावर कार्यक्रमाला सुरुवात ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा; म्हणाले ” काही लोकांनी बेईमानी केली…!”

Posted by - January 19, 2023 0
मुंबई : मुंबईत 38 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत बीकेसी मैदानावर उपस्थित…

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे

Posted by - March 13, 2023 0
मुंबई : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे…
Pune News

Pune News : भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने अनोखे आंदोलन

Posted by - January 6, 2024 0
पुणे : भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात (Pune News) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी अनोखे…

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा; सिसोदिया म्हणाले…..

Posted by - August 19, 2022 0
नवी दिल्ली: सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित 21 ठिकाणी छापेमारी केली…

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून अंबरनाथमध्ये पतीकडून पत्नीची हत्या

Posted by - May 29, 2023 0
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये लग्नाला 12 वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *