महापालिकांच्या निवडणुकांसाठी 23 जूनला मतदारयाद्या प्रसिद्ध होणार

155 0

पुणे- कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ,उल्हासनगर, वसई-विरार, ठाणे, अमरावती, नागपूर, नाशिक, बृहमुंबई, सोलापूर आणि पिंपरी- चिंचवड या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्या वेळापत्रकानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या येत्या 23 जून या दिवशी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी 17 जून रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. पण आता या वेळापत्रकामध्ये निवडणूक आयोगाने बदल केले आहेत. त्यानुसार आता येत्या गुरुवारी (२३ जून) रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, तर 23 जून ते 1 जुलै पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

यानंतर अंतिम मतदारयाद्या 9 जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. राज्यातील 14 महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मे 2022 रोजी अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणाची सोडत झाली. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्याचे आदेश दिले. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती व सुचनांतर 13 मे रोजी प्रभागरचना अंतिम करण्यात आली. प्रभाग रचना अंतिम करताना प्रभागमध्ये बदल झाले असून मतदार संख्येतही बदल झाले आहेत.

Share This News

Related Post

युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणू, व्ही मुरलीधरन यांचे पालकांना आश्वासन

Posted by - March 2, 2022 0
पुणे- रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय विद्यार्थी हे अडकले असून या…
Satara News

Satara News : ‘खूप केलं माणसांसाठी आता बस्स’… व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

Posted by - June 24, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना (Satara News) घडली आहे. यामध्ये मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो व त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली आणि…

‘ तो ‘ मेसेज पाकिस्तानमधून ? मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ ; पोलीस प्रशासन अलर्ट

Posted by - August 20, 2022 0
मुंबई : मुंबई ट्रॅफिक कंट्रोल धमकीच्या मेसेजमुळे मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. 26/11 सारखा हल्ला घडवून आणू असा धमकीचा मेसेज…
Nitin Gadkari

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - May 16, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा धमकीचा (Threat) फोन आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली…
AJIT PAWAR

विरोधी पक्षनेते अजित पवार ‘त्या’ विधानावर ठाम! पत्रकार परिषद घेत म्हणाले…

Posted by - January 4, 2023 0
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. अजित पवारांविरोधात भाजपने ठिकठिकाणी आंदोलने केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *