पुणे महापालिकेत लवकरच नव्या 200 पदांची भरती; आरोग्य, अग्निशमन दल आणि अन्य विभागातील वरिष्ठ पदांसाठी भरती

256 0

पुणे : पुणे महापालिकेत नव्या 200 पदांची भरती केली जाणार आहे. आरोग्य, अग्निशमन दल आणि अन्य विभागातील वरिष्ठ पदभरती केली जाणार असून ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे.

महापालिकेकडून सध्या 448 पदांची भरती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता, लिपिक, अतिक्रमण सहायक निरीक्षक, सहायक विधी सल्लागार या पदांवरील 448 जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. ऑनलाइन परीक्षेनंतर गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. तर कनिष्ठ अभियंता पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यातच या नव्या दोनशे पदांची भर पडणार असल्याची महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी माहिती दिली.

डिसेंबर महिन्यात 200 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. यामध्ये काही जागा या वरिष्ठ पदाच्या असणार आहेत. महापालिकेत 34 गावांचा समावेश झाला आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढणे आवश्यक असल्याने 2007 मध्ये तयार केलेल्या आकृतिबंधातील जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात आकृतिबंधाचा आढावा घेऊन त्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल, असंही आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Posted by - April 20, 2024 0
हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील…

#MURDER : सामायिक विहिरीतील पाण्यावरून जुंपली; भावकीतील कुटुंबाने काका पुतण्याला दिला असा भयानक अंत

Posted by - March 11, 2023 0
सांगली : सांगलीतील जत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामायिक विहिरीच्या पाण्यावरून दोन कुटुंबामध्ये जबरदस्त वाद झाला. यानंतर…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Posted by - June 15, 2024 0
हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या 119 व्या पुण्यतिथी निमित्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात…

सप्टेंबर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ‘या’ विधानानं राज्यात खळबळ

Posted by - August 19, 2023 0
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून मोठा दावा करत असून आता सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल असा दावा…

चांदणी चौकातील राडारोडा हटवण्याचा काम सुरू वाहतूक अजूनही बंदच

Posted by - October 2, 2022 0
पुणे:प्रचंड गाजावाजा झालेला चांदणी चौकातला पूल अखेर पाडण्यात आला. सहाशे किलो स्फोटकं वापरून शनिवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोटाद्वारे मध्यरात्री २.२३ वाजता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *