पुणेकर घेणार मेट्रो प्रवासाचा आनंद ! दिवसाला किती मेट्रो धावणार ? जाणून घ्या वेळापत्रक

193 0

पुणे- महामेट्रोचे पुण्यात पहिल्या टप्यातील मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत मेट्रोतून प्रवास करत येणार असल्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे मेट्रो हे शहराच्या विकासाच्या दृष्टीने टाकण्यात आलेले मोठे पाऊल आहे,असे मानत पुणेकरही मेट्रोतून प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत.

येत्या 6 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर मेट्रो ट्रेन दिवसातून 12 वेळा गरवारे कॉलेज ते वनाज दरम्यान धावणार आहे. म्हणजेच सुरुवातीला एका तासाला ही गाडी प्रवाशांना सेवा पुरवेल.

ही आहेत वैशिष्ट्ये

*एका डब्यात 325, तर तीन डब्यांमध्ये असणार 975 प्रवासी
*दिवसभरात 11 हजार 700 प्रवाशांना करता येणार प्रवास
*एक डब्बा महिलांसाठी असणार राखीव
*पुणेकरांना 3 कोचच्या 34 मेट्रो ट्रेन पुरविणार सेवा
*वनाज येथे पार्किंग आणि देखभाल दुरूस्ती

असे आहे वेळापत्रक

*सकाळी पहिली गाडी – सकाळी 7 वाजता
*शेवटची गाडी – रात्री 10 वाजता
*दर तासाला किंवा अर्ध्या तासाला गाडी उपलब्ध
*तिकीट कमीत कमी 10 रु. जास्तीत जास्त 50 रु.

Share This News

Related Post

रियल इस्टेट एजंट म्हणून काम करण्याचा विचार करताय ? यापुढे महारेराची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, ही बातमी वाचाच

Posted by - January 14, 2023 0
महाराष्ट्र : रियल इस्टेट एजंटसच्या कार्यपद्धतींमध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगता आणण्यासाठी नियमक आणि कायदेशीर फ्रेमवर्क आणि पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी…

ई-बस नंतर आता ऑलेक्ट्रा घेऊन येणार भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक

Posted by - April 17, 2022 0
सध्या पेट्रोल-डीझेल यांच्या वाढत्या किंमती, प्रदूषण, वातावरणातील बदल यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना  प्राधान्य दिले जात आहे. आता पुण्याच्या रस्त्यावर ऑलेक्ट्राच्या 150…
Ajit Pawar

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

Posted by - April 11, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे च्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावामुळे ते अनेकवेळा अडचणीतसुद्धा सापडले आहेत.…

सिंहगड किल्ल्यावर ‘प्लॅस्टिक बंदी’ होणार अधिक कडक; बंदीचं पालन न केल्यास भरावा लागेल दंड

Posted by - November 17, 2022 0
पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आता प्लास्टिक बंदी अधिक कडक करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या आवरणात विकले जाणारे वेफर्स, नूडल्स यासारखे…

पुण्यातील स्टार्टअप नवउद्योजकांचा विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून सत्कार

Posted by - January 29, 2022 0
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून पुण्यातील राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आलेल्या स्टार्टअप सुरू करणाऱ्या पाच नवउद्योजकांचा सत्कार करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *