पुणे : नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग

245 0

पुणे : आज दिनांक ०३•११•२०२२ रोजी दुपारी ११•५८ वाजता नगर रस्ता, वडगाव शेरी, सोपान नगर येथे एका भंगारच्या गोडाऊनला आग लागली असल्याची वर्दि दलाच्या नियंञण कक्षात मिळताच व नागरिकांचे सतत फोन येत असल्याने प्रथम येरवडा व धानोरी अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन व एक टँकर रवाना करण्यात आला. त्याचवेळी वर्दिवर पोहोचताना अधिकारी सुभाष जाधव यांनी दुरूनच मोठा धूर पाहत अतिरिक्त फायरगाडी व टँकरची मागणी करताच नायडू, हडपसर तसेच पीएमआरडीए आणि दलाचे व महापालिकेचे वॉटर टँकर अशी एकुण सुमारे १५ वाहने व ०८ अग्निशमन अधिकारी व जवळपास ५० ते ६० जवान दाखल होते.

घटनास्थळी पोहोचताच आग भीषण स्वरुपात असल्याचे निदर्शनास येताच दलाच्या जवानांनी होज पाईप वापरत पाण्याचा मारा सुरू केला. त्याचवेळी अग्निशमन अधिकारी यांनी आगीमधे कोणी आत अडकले आहे अथवा कसे याची चौकशी करत खाञी केली असता कोणी नसल्याचे समजले. त्या ठिकाणी सुमारे ६,००० स्केवर फुट व शेजारीच ४,००० स्केवर फुट जागेत पञ्याच्या शेडमधे उभारलेले हे भंगार मालाचे गोडाउन असल्याने जवानांनी घन, पोगर, कटर व इतर अग्निशमन उपकरणांचा वापर करीत पञा काढत आतमधे प्रवेश करुन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.

सुमारे तासाभरा नंतर दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत शेजारी जवळच असलेली पञ्याची शेडची काही घरे व दुकाने यांना आगीच्या ज्वाळांपासून वाचविले व मोठा धोका टाळला. या गोडाऊधमनमधे छोटे व मोठे असे एकुण ०८ ते १० सिलेंडर ही फुटले. घटनास्थळी जेसीबी यांची मदत घेत जळालेला माल आजुबाजूला करीत पाणी मारत आग पुर्ण विझवली. शेजारील पाण्याच्या हौदातून पंपाच्या साह्याने पाण्याचा उपसा केला. सदर ठिकाणी कोणीही जखमी नसून जिवितहानी नाही याची खाञी केली.

या कामगिरीत दलाचे वरिष्ठ अधिकारी रमेश गांगड, गजानन पाथ्रुडकर, विजय भिलारे, सुभाष जाधव व पीएमआरडीएचे विजय महाजन व इतर जवानांनी सहभाग घेतला.

“भंगार साहित्यामध्ये बरेचसे सिलेंडर होते. ज्यांच्या स्फ़ोट होता त्या मुळे अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती अशा वेळेस अग्निशमन दलाने अतिशय कौशल्यपूर्ण परिस्थिती हाताळून आगीवर नियंत्रण मिळवले ” अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.

Share This News

Related Post

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांची घेतली भेट 

Posted by - July 19, 2022 0
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे…

“मराठी शाळा वाचल्याच पाहिजे !” पुण्यात छात्रभारती विद्यार्थी संघटनेने चिकटवले पोस्टर

Posted by - October 10, 2022 0
पुणे : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 100 एस.टी बसेसला…
Pune News

Pune News : बोगस शिवसैनिकास खऱ्या आणि विजय शिवतारेंच्या कडवट शिवसैनिकाने दिले ‘हे’ उत्तर

Posted by - April 1, 2024 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमधून माघार घेतली. गेल्या अनेक…
Vishal Agrawal

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - May 22, 2024 0
पुणे : पुणे कार अपघाता प्रकरणी (Pune Car Accident) पोलिसांनी चालक मुलाचे वडील विशाल अग्रवालला अटक केली असून आज त्याला…

मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करावा आणि नंतर मेळावा घ्यावा

Posted by - September 25, 2022 0
पुणे: राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्ता नाट्यानंतर अखेर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *