#PUNE : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी; भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे सर्व पक्षांना आवाहन

567 0

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब , उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आणि पुण्यातील सर्व पक्षांच्या शहर अध्यक्षांना पत्र लिहून केले आहे.

मुळीक म्हणाले, देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे अनन्यसाधारण स्थान आहे. विकासकामात राजकारण केले जात नाही. सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी उत्तम प्रकारचे संबंध प्रस्थापित करतात. तसेच लोकप्रतिनिधीच्या निधनासारख्या दुःखद घटनेनंतर सर्वसंमतीने पोटनिवडणूक बिनविरोध होते.’

मुळीक पुढे म्हणाले, ही परंपरा कायम राखीत कसबा मतदार संघाची निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. बिनविरोध निवडणूक करणे हीच मुक्ताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल.

मुळीक पुढे म्हणाले, भाजप आणि मित्रपक्षांनी अंधेरीत शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध आपला उमेदवार दिला नाही. तसेच काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नाही. कसबा मतदारसंघात ही परंपरा कायम ठेवावी.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या दुःखद निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. स्वातंत्र्य चळवळीचे अध्वर्यू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा राजकीय वारसा मुक्ताताईनी समर्थपणे पुढे चालविला. पुणे शहराच्या विकासात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यांचे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी सौहार्दपूर्ण संबंध होते.

Share This News

Related Post

MS Swaminathan

MS Swaminathan : भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन

Posted by - September 28, 2023 0
चेन्नई : भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांचे चेन्नई येथे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 98…
Pune Crime

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Posted by - March 22, 2024 0
पुणे : मागच्या काही महिन्यांपासून पुणे पोलिसांनी (Pune News) गुन्हेगारांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्स विक्रीचा…

#AMITABH BACHHAN : ‘प्रोजेक्ट-के’च्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांच्या बरगडीला दुखापत

Posted by - March 6, 2023 0
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट-के’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाले. बिग बींनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दुखापतींची माहिती दिली. त्याच्या बरगडीला…
Pimpri Chinchwad Fire

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये मेडिकल दुकानाला भीषण आग; संपूर्ण मेडिकल जळून खाक

Posted by - July 27, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Fire) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर भागात…

शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

Posted by - May 30, 2022 0
केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *