पुणे : बालकामगार प्रथेविरोधी जन जागृती अभियानाची अमंलबजावणी

156 0

पुणे : कामगार विभागाच्यावतीने १४ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालकामगार प्रथेविरोधी जन जागृती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

या कालावधीमध्ये जिल्हा कृती दलामार्फत विविध ठिकाणी धाडसत्राचे आयोजन करणे, बालकामगार प्रथा विरोधी फलक प्रदर्शित करणे, फेरीचे आयोजन करणे तसेच विविध व्यवसायिक, मालक व संघटना आदी कडून बालकामगार कामावर ठेवणार नाही अशा स्वरुपाची हमीपत्रे भरुन घेण्यात येत आहे. बालमजूरी विरोधी शपथ घेणेआदी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन कायद्यातील नवीन तरतुदीनुसार १४ वर्षाखालील मुलांना मजूरी करण्यास भाग पाडणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत सजगता बाळगावी तसेच १४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना धोकादायक काम करण्यास भाग पाडणे, अशा गुन्ह्यांपासून सर्वानी दूर रहावे. मुलांना शाळेत पाठविणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. सर्वानी मिळून बालमजुरी या अनिष्ट प्रथेचे समुळ उच्चटन करुया, असे आवाहन अपर कामगार आयुक्त शैलेद्र पोळ यांनी केले आहे.

Share This News

Related Post

पुन्हा बंधनं नको असतील तर; कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Posted by - April 27, 2022 0
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल…
Pune Crime News

Pune Crime News : ऐन सणासुदीच्या वेळी पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई! 5 टन बनावट पनीर जप्त

Posted by - August 29, 2023 0
पुणे : पुणेकरांनो (Pune Crime News) तुम्ही खात आहात ते पनीर भेसळयुक्त तर नाही ना? कारण ऐन सणासुदीच्या तोंडावर पुण्यात…
Maratha Reservation

Maratha Reservation : राज्यात आतापर्यंत आढळल्या 57 लाख कुणबी नोंदी

Posted by - January 30, 2024 0
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर (Maratha Reservation) राज्यात कुणबी नोंदींचा शोध घेण्याचं काम राज्य सरकारनं युद्धपातळीवर हाती…

Pune News : यावर्षीही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळाच्या दहीहंडीचा थरार

Posted by - September 6, 2023 0
पुणे : श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात…

#BTS ARMY : J. Hope देखील सैन्यात भरती होणार, जाण्यापूर्वी त्याने चाहत्यांशी संवाद साधला

Posted by - February 26, 2023 0
काही तासांपूर्वी बिगित म्युझिकने आपल्या चाहत्यांना सांगितले होते की, त्यांचा खास सदस्य जय होप लष्करात आहे. यानंतर रविवारी जय होपने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *