पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा विश्व हिंदू मराठा संघाचे कार्यकर्ते ताब्यात VIDEO

229 0

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अवमानकारक विधानाच्या निषेधार्थ पुण्यात आज सकाळी विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. चतु:शृंगी मंदिरापासून राजभवनापर्यंत ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार होती मात्र त्या आधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं की तुमचा आयकॉन कोण ? तुमचा आवडता नेता कोण ? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येतोय.

राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीनं आज राज्यपाल कोश्यारी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पुण्यातील चतु:शृंगी मंदिरापासून राजभवनापर्यंत ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार होती मात्र त्या आधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती मात्र तरीही हे आंदोलन करण्यात आलं.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 13, 2023 0
पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune News) मुळशी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणाचा…

खासदार गिरीश बापट गेले….. पण जनसंपर्क कार्यालयातील कामकाज नाही थांबले

Posted by - March 30, 2023 0
खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांना जाऊन २४ तास उलटत…

कोळसा संकटामुळे रेल्वेने पुढील 20 दिवस रद्द केल्या 1100 गाड्या

Posted by - May 5, 2022 0
नवी दिल्ली- एकीकडे कडक उन्हामुळे देशभरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर दुसरीकडे देशात कोळशाची प्रचंड प्रमाणात टंचाई निर्माण…

अध्ययन आणि विश्लेषणाच्या जोरावर प्रगती होते, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांचे प्रतिपादन

Posted by - May 19, 2022 0
पुणे- “अध्ययन आणि विश्लेषण या दोन तत्वांच्या जोरावर सदैव प्रगतीपथाची पायरी चढता येते. देश व समाज ही प्राथमिकता ओळखून कार्य…

पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड प्रेसला पाठवलेले पत्र मनसेकडून सादर, शरद पवार माफी मागणार का ?

Posted by - April 14, 2022 0
मुंबई- जेम्स लेन प्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *