#PUNE FIRE : भवानी पेठ येथे वखार आणि गॅरेजमध्ये आगीची घटना

388 0

पुणे : आज दिनांक २३\०२\२०२३ रोजी दुपारी ११•०२ वाजता ७९७ भवानी पेठ, निशात टॉकीज जवळ आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालयातून दोन अग्निशमन वाहन व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी मोकळ्या मैदानात अंदाजे ३००० स्के.फुट जागेत लाकडाची वखार व गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निदर्शनास आले असता जवानांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरु करत जवळपास पंधरा मिनिटात आगीवर नियंञण मिळवले आणि कुलिंग करीत किमान तीस ते पस्तीस मिनिटात आग पुर्ण विझवली. आगीचे स्वरुप पाहता दलाची कसबा व गंगाधाम अग्निशमन वाहन ही अतिरिक्त मदत मागवण्यात आली होती. सदर ठिकाणी कोणी जखमी नसून आगीचे कारण समजू शकले नाही.

आगीमधे पञ्याच्या शेडमधे ठेवण्यात आलेले लाकूड सामान, फर्निचर व दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदिप खेडेकर तसेच वाहन चालक अतुल मोहिते, केतन साठे, संदिप थोरात, प्रशांत मखरे व तांडेल मंगेश मिळवणे आणि जवान चंद्रकांत गावडे, चंद्रकांत आनंदास, दिगंबर बांदिवडेकर, संतोष अरगडे, गणेश लोणारे, सुधीर नवले, चंदु मेनसे, अक्षय दिक्षित, सागर शिर्के यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

#FIRE CALL : पिरंगुटमधील सुजनील केमिको कंपनीमध्ये आगीची घटना

Posted by - February 20, 2023 0
पुणे : पिरंगुटमधील सुजल केमिको कंपनीला आज दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. दरम्यान पीएमआरडीए अग्निशमन केंद्र मारुंजी आणि…
Pune News

Pune News : निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

Posted by - May 1, 2024 0
पुणे : पुणे लोकसभेसाठी (Pune News) भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी पुणे कँटोंमेन्ट विधानसभा मतदारसंघातील…

CRIME NEWS : जबरी चोरी आणि खून प्रकरणी आरोपीला बारा वर्षानंतर जन्मठेप; निगडी प्राधिकरणातील 2011 साली घडलेली घटना

Posted by - January 10, 2023 0
पिंपरी : 26 ऑगस्ट 2011 रोजी दुपारी बारा ते दोनच्या सुमारास एका घरामध्ये घुसून महिलेची कोयत्याने हत्या आणि त्यानंतर घरातील…

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - August 28, 2023 0
पुणे : पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर,…

” अमृता फडणवीस..,चितळे यांच्या बद्दल उपमुख्यमंत्री कधीही का बोलत नाहीत? ” सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

Posted by - January 3, 2023 0
पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई यांच्या नायगाव जन्मगावी आज अनेकांनी हजेरी लावून अभिवादन केले. पुण्यातील अभिवादन कार्यक्रमासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *