#PUNE FIRE CALL : मध्यराञी हडपसर, हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे भाजी मंडईला मोठी आग…

256 0

पुणे : मध्यराञी ०१•४४ वाजता (२१\०२\२०२३) हडपसर, हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे असणारया भाजी मंडईमध्ये आग लागल्याची घटना घडली. आगीची वर्दि अग्निशमन दलाकडे येताच काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र, हडपसर व कोंढवा बुद्रुक येथून एकुण तीन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निदर्शनास आले. जवानांनी तातडीने चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व त्याठिकाणी कोणी इसम नसल्याची खाञी केली. जवानांनी २५ मिनिटात आग पुर्ण आटोक्यात आणत कुलिंग करुन आग पुर्ण विझवत धोका दूर केला.

त्याठिकाणी छोटे भाजी विक्रीकरिता असणारे अंदाजे ९० स्टॉल असून जवळपास सर्व स्टॉलचे आणि त्यामध्ये असणारया भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तिथे असणारे दोन टेम्पो ही जळाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच तांडेल विलास दडस व जवान अनिमिष कोंडगेकर, चंद्रकांत नवले, बाबा चव्हाण, दशरथ माळवदकर, विशाल यादव, प्रकाश शेलार यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान दिन साजरा

Posted by - November 26, 2022 0
पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय संविधानाची माहिती…
Pune News

Pune News : खराडीत लावणीच्या तालावर महिलांनी धरला ठेका

Posted by - August 14, 2023 0
पुणे (खराडी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने होम मिनिस्टर आणि महिलांसाठी पारंपारिक लावणीचे आयोजन करण्यात आले होते.…

मैत्री फाऊंडेशन व राजस सोसायटीच्या रक्तदान शिबिरात 52 जणांचे रक्तदान

Posted by - June 13, 2022 0
पुणे- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मैत्री फाऊंडेशन, पुणे व राजस सोसायटी, कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात…
Pune Crime News

Pune Crime News : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलाची बदनामी; आरोपीवर गुन्हा दाखल

Posted by - May 29, 2024 0
पुणे : पुण्यामधून (Pune Crime News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे फोटो मॉर्फ करून अश्लील…

‘शिवसेना आघाडीतून बाहेर पडायला तयार, अगोदर २४ तासात परत या !’ संजय राऊत यांचे वक्तव्य

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेना आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, मात्र २४ तासात परत या. तुमच्या मागणीचा नक्कीच विचार केला जाईल. असे वक्तव्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *