पुणे : घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने घरामधे आग ; महिला जखमी

244 0

पुणे : आज पहाटे ०३•०५ वाजता (दिनांक २७•०९•२०२२) नरहे गाव, भैरवनाथ मंदिराजवळ, सोनाई निवास येथे चार मजली इमारत असलेल्या ठिकाणी तळमजल्यावरील घरामधे (हॉल-किचन) घरगुती सिलेंडरमधून वायुगळती झाल्याने स्फोट होत आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाला वर्दि मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचताच घरामधील वायुगळती असणारा सिलेंडर प्रथमतः बाहेर काढत जवानांनी पाण्याचा मारा करत गृहपयोगी वस्तुंना लागलेली आग इतरञ पसरु न देता पुर्ण विझवत पुढील धोका टाळला. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले.

त्याचवेळी जवानांनी घरातील मोकळे इतर दोन सिलेंडर बाहेर काढले व सुरक्षेच्या कारणास्तव वायुगळती होत असलेला सिलेंडर स्वतच्या ताब्यात घेतला. तसेच अग्निशमन अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार, दलाची मदत पोहोचण्याआधी घरातील महिला हि आगीमुळे जखमी (भाजली) झाल्याने तिच्या पतीने तिला तातडीने खाजगी रुग्णालयात नेल्याचे समजले.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अधिकारी प्रभाकर उम्राटकर, तांडेल पांडुरंग तांबे, वाहन चालक संतोष चौरे व फायरमन नितीन मोकाशी, सतीश डाकवे, संजू चव्हाण तसेच मदतनीस कोकरे, जाधव यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

आज ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तर सभा, पुन्हा गाजणार ‘लाव रे तो व्हिडिओ’?

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांची आज मंगळवारी संध्याकाळी ठाण्यात उत्तर सभा होत आहे. ठाण्यात ठिकठिकाणी राज ठाकरे यांच्या…
Atal Setu

Atal Setu : देशातील सर्वात लांब सागरी पुल अटल सेतूची काय आहेत वैशिष्ट्ये ?

Posted by - January 12, 2024 0
मुंबई : शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू (Atal Setu) या भारतातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने भाजपाला मदत केली म्हणून… , भाजपच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Posted by - June 11, 2022 0
मुंबई- ज्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकारण निर्माण झाले होते ती सहावी जागा मिळवत भाजपने विजयाचे सेलिब्रेशन केले. एकीकडे भाजपाने घोडेबाजार…

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मल्टी मीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन

Posted by - November 9, 2022 0
पुणे : जगात लोकशाहीचा विकास होत आहे; देशांची प्रगती होत आहे. अनेक समस्या असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सर्व घटक सहभागी…
Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार? भाजपकडून चाचपणी सुरु

Posted by - September 1, 2023 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली आहे. भाजपच्या उच्चपदस्थ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *