पुणे : महापौर हा शब्द कसा आला माहित आहे का ? आजही फक्त महाराष्ट्रात ‘मेअर’ ऐवजी वापरला जातो ‘महापौर’ हा शब्द ! असा आहे रंजक इतिहास…

669 0

तुम्ही कधी हा विचार केलाय का ? की संपूर्ण भारतामध्ये ‘मेयर’ हा शब्द वापरला जात असताना आपल्या महाराष्ट्रामध्येच ‘महापौर’ हा शब्द कसा बरे वापरला जात असावा ? तर आज हा शब्द नक्की कसा आला या विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

तर या शब्दाचे निर्माते आहेत स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर… हो मेअरच्या ऐवजी मराठमोळा महापौर हा शब्द महाराष्ट्राला दिला आहे. तो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी….

खरंतर महापौर हा शब्द मराठी शब्दकोशातच नव्हता. जेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होतं त्यावेळी मेयर हाच शब्द प्रचलित होता. एव्हाना आज सुद्धा भारत भरामध्ये मेअर हाच शब्द वापरला जातो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र महापौर हाच शब्द आता वापरला जातो. इंग्रज भारताला सोडून गेल्यानंतर सुद्धा आपल्या भारतामध्ये अनेक इंग्रजी शब्दांचं दान देऊन गेले होते. आजही आपण बऱ्याच वेळा म्हणतोच इंग्रज सोडून गेले पण भाषा मागे सोडली.

तर झालं असं की, अनेक प्रचलित इंग्रजी शब्दांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शुद्ध मराठी शब्द दिले. एक दिवस गणपतराव नलावडे हे पुणे शहराचे मेअर झाले. अशी बातमी सावरकरांना मिळाली होती. गणपतराव नलावडे हे सावरकरांना मानणारे होते. यावेळी अभिनंदनाचे पत्र सावरकरांनी नलावडे यांना लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी लिहिले की, ” पत्र पाठवण्यास विलंब होत आहे. क्षमस्व, मेअर या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो शब्द मिळाला ‘महापौर’ हा शब्द अधिक योग्य वाटतो.” आणि त्यानंतर पुण्याचे मेअर गणपतराव नलावडे यांच्या कार्यालया बाहेरची पाटी बदलली गेली. ‘मेअर ऑफ पुणे’ ही पाटी काढून तिथे महापौर अशी पाटी लावण्याचे आदेश स्वतः महापौर गणपतराव नलावडे यांनी दिले, आणि असा मिळाला महाराष्ट्राला ‘महापौर’ हा शब्द…

Share This News

Related Post

Amit Thackeray

Vasant More : अमित ठाकरेंचा ‘तो’ घाव वसंत मोरेंच्या जिव्हारी लागला अन् तोच ठरला टर्निंग पॉईंट

Posted by - March 13, 2024 0
पुणे : मनसेचे पुण्यातील माजी नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात या गोष्टीचा जोरदार चर्चा रंगली…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा संपन्न

Posted by - March 12, 2023 0
  पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिनांक ११ व १२ मार्च २०२३ रोजी विद्यापीठाची अधिसभा संपन्न झाली. या अधिसभेत विद्यार्थी…
Raja Shiv Chhatrapati Mahakavya

Raja Shiv Chhatrapati Mahakavya : मुस्लिम मावळ्याची अनोखी ‘शिवनिष्ठा’, छत्रपती शिवरायांवर रचलं ‘महाकाव्य’

Posted by - September 8, 2023 0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाने (Raja Shiv Chhatrapati Mahakavya) प्रेरित झालेल्या एका मुस्लीम मावळ्यानं एक अनोख कामं केलं आहे. शिवरायांवरील असलेल्या…

ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं; आशिष शेलार यांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

Posted by - January 28, 2022 0
मुंबई – विधीमंडळाने केलेले 12 भाजप आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने आज रद्द केले. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला जोरदार धक्का बसला…
Weather Update

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - April 29, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रावर अजूनही अवकाळी पावसाचे (Weather Update) ढग कायम आहेत. आज आणि उद्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *