#PUNE CRIME : मालामाल होण्याच्या नादात पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 6 कोटी रुपयांची फसवणूक; म्हणे नासा आणि इस्रोमध्ये…

958 0

पुणे : पुण्यातील 250 हून अधिक नागरिकांची सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चार जणांच्या टोळक्याने पुणेकरांना कोट्यावधीचा गंडा घातलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात एका हॉटेलमध्ये चार जणांनी गुंतवणूकदारांसाठी बैठक बोलावली होती. यात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या संशोधन संस्था नासा मधील लोक भारतात येणार असून यावेळी शास्त्रज्ञ राईस पुलर या यंत्रावर संशोधन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राईस पुलर या धातूच्या भांड्याला संपूर्ण जगात मागणी असल्यामुळे पुणेकरांनी एक लाख रुपये यामध्ये गुंतवले होते. यावरून या सर्वांना एक कोटींचा परतावा मिळेल अशी बतावणी या टोळक्याने केली होती. तसेच बनावट कागदपत्र तयार करून या नागरिकांकडून पैसे देखील जमा करून घेण्यात आले होते.

या चार भामट्यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या चौघांचा आता तपास सुरू आहे.

Share This News

Related Post

प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून मंजूर

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. बोगस…

पिंपरी-चिंचवड महापालिकेला आली जाग, भोसरीच्या उड्डाणपुलाला १२ वर्षानंतर सुरक्षा कठडे

Posted by - April 13, 2022 0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तयार होऊन जवळपास बारा वर्षे झाली आहेत. आता बारा वर्षानंतर उड्डाणपुलाला सुरक्षा…

मनोरंजन : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने महाराष्ट्राला लावले वेड; सैराटचाही मोडला विक्रम, तुम्ही पाहिलात का ?

Posted by - January 9, 2023 0
महाराष्ट्र : रितेश आणि जेनेलियाच्या वेड या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या चित्रपटाने सैराट या मराठी चित्रपटाचा देखील…

11 डिसेंबर रोजी पुण्यात पादचारी दिनानिमित्त उद्या लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील उंबर्‍या गणपती चौक ते गरूड गणपती चौकदरम्यान वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *