#PUNE : प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

525 0

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे यांनी महात्मा फुले वाडा, समाताभूमी येथे वंदन करून सकाळी प्रचार पदयात्रेस प्रारंभ केला. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस अध्यक्षा विद्या चव्हाण, प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा मृणाल वाणी, शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमलताई व्यवहारे यांसह विक्रम खन्ना, हेमंत राजभोज, यासिर बागवे, गणेश नलावडे, सारिका पारेख, रत्ना नाईक, वनिता जगताप, सरिता काळे आदी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

ही पदयात्रा बागवे कमान, महात्मा फुले वाडा, चांदतारा चौक, जोहरा कॉम्प्लेक्स मार्गे सुमित डांगे यांच्या दुकानापाशी समाप्त झाली. जोहरा कॉम्प्लेक्स आणि रामकृष्ण हौसिंग सोसायटी येथे प्रणिती शिंदे यांनी कोपरा सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधला. रामकृष्ण हौसिंग सोसायटी येथे चर्मकार समाजाने धंगेकर यांना पाठींबा दिला. खडकमाळ आळी येथे लोधी समाजानेदेखील धंगेकर यांना पाठींबा दिला. याप्रसंगी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मोदी सरकारने महागाई आणि बेकारी आणली, त्यांनी अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली, कॉंग्रेसच्या नेत्या खा.सोनिया गांधी अन्नसुरक्षा कायदा आणला. प्रत्येक गरिबाला स्वस्त दरात पुरेसे धान्य देण्याची तरतूद केली.

मोदी सरकारने मात्र हे सारे बदलले. त्यामुळेच आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. या पोटनिवडणुकीत सर्वाधिक मतदान करून धंगेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. यावेळी उपस्थित ३००-४०० नागरिकांनी उत्स्फुर्तपणे ‘धंगेकर जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या व येथेच पदयात्रा संपली. या पदयात्रेत प्रणिती शिंदे स्वतः घोषणा देत असल्याने सहभागी महिलांनादेखील जोश आला होता.

यानंतर प्रणिती शिंदे यांनी मामलेदार कचेरी जवळील श्री शिवाजी मराठा सोसायटी येथे भेट दिली. तेथील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

Share This News

Related Post

India Alliance

India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा निर्णय ! 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट

Posted by - September 15, 2023 0
विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीने (India Alliance) 10 न्यूज चॅनल्सच्या एकूण 14 टीव्ही अँकर्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाहीतर…

ऑनलाइन नोंदणी शिवाय मिळेल कोरोना लस; पुणे महापालिकेचा निर्णय

Posted by - June 4, 2022 0
पुणे- पूर्वी कोविन ॲपवर नोंदणी केल्याशिवाय कोरोना प्रतिबंधक लस मिळणं शक्य नव्हतं. परंतु, आता महापालिकेच्या निर्णयानुसार ऑनलाइन नोंदणी न करता…

राज ठाकरे उद्या बीडच्या परळी कोर्टात लावणार हजेरी ! परळी कोर्टाने काढले ‘त्या’ प्रकरणात राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - January 17, 2023 0
परळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे उद्या बीडच्या परळी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत चितावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या…

पुणे : नगरसेवक गफूर पठाण यांच्याविरुद्ध ॲडव्हर्टायजिंग कंपनी प्रतिनिधीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल

Posted by - October 29, 2022 0
पुणे : नगरसेवक गफूर पठार यांच्याविरुद्ध ऍडव्हर्टायझिंग कंपनी प्रतिनिधीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

कर्नाटकचे मंत्री मूर्ख ! आधी सीमा भाग केंद्रशासित होईल, संजय राऊतांचा चढला पारा, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - December 28, 2022 0
मुंबई : कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वत नारायण यांनी मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी केली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *