पुणे :स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने आनंदोत्सव

741 0

पुणे : दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा विभाग ३ डिसेंबरपासून कार्या‍न्वित होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्देश दिले होते. प्रहार अपंग क्रांती संस्था (संलग्न) महाराष्ट् राज्य मूकबधिर दिव्यांग कल्याण संघटनेच्या वतीने मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस व आ. बच्चूभाऊ कडु यांचे जाहीर आभार व आनंदोत्सव लाडू वाटप करुन करण्यात आले.

सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करुन हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंड‍ळ व त्यांची कार्यालयं यांचा देखील समावेश असेल. या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी-कर्मचारी मिळून २०६३ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. यामध्ये सचिवस्तरापासून ते शिपायांपर्यंतच्या पदांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ११८ कोटी खर्चासही मंजूरी देण्यात आली.
सध्या महाराष्ट्रात ३० लाखांपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात.

जिल्हास्तवर देखील जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे काम पाहतात. या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणारे अधिनियम आणि योजना राबवण्यात येतील. यामध्ये विशेषत: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वंयरोजगारासाठी बीजभांडवल, विविध पारितोषिके, क्रीडा स्पर्धा, व्यवसायासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग दिन साजरा करणे, मतिमंदाकरीताची बालगृहे, दिव्यांग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन यासारखे बाबींचा समावेश आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाव्हुणे म्हणून प्रहारचे राज्य उपाध्यक्ष अभय पवार, प्रहार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष दत्ता भोसले, उपाध्यक्ष राजू वाकचौरे ,प्रहार प्रसिध्दी प्रमुख रफिक खान, प्रहार पुणे शहर महिलाध्यक्षा मीनाताई धोञे, प्रहार कोथरुड महिलाध्यक्षा सुनंदा बामणे, दिव्यांग मूकबधिर शहर अध्यक्ष रवि मुदगल, सौ अंबुताई गोविंदगिरी (मूकबधिर महिलाध्यक्षा) सौ. केतकी अहिरे, सौ. संगिता कुलकर्णी, सौ. सुनीता लाटे, रविंद् देवकुळे, विशाल साठे, सोनु कुमावत, सुजित गोयर, अनिल क्षीरसागर, अनिल मिरेकर, लाल माटा, शमशाद शेख, तृप्ती भोसले, राणी गोळे, जया जगताप, सदर कार्यक्रमास 250 मूकबधिर उपस्थित होते .

Share This News

Related Post

Aandolan

पुण्यातील संचेती रुग्णालयाजवळील उड्डाणपुलावर चढून तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन

Posted by - May 30, 2023 0
पुणे : पुण्यातील संचेती रुग्णालयाजवळील (Sancheti Hospital) उड्डाणपुलावर चढून एका तरुणानं शोले स्टाईल जीवघेणं आंदोलन सुरु केलं आहे. त्याने हे…

‘मी तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल..’. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

Posted by - April 4, 2023 0
घरी बसून राजकारण करणाऱ्यांनी मला शिकवू नये. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी…

सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा; सदावर्ते यांच्या अंगावर फेकली काळी शाई; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 26, 2022 0
सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हे राज्यातील विविध भागात जाऊन ठिकठिकाणी पत्रकार परिषद…

Ajit Pawar press conference : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा -विरोधीपक्षनेते अजित पवार (Video)

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : विधिमंडळ अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार…
Modi And Farmer

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी अकाउंटमध्ये येणार पीएम किसानचा 14 वा हप्ता

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसानचा 14 (PM Kisan Yojana) वा हफ्ता 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *