#PUNE : लोककला पथकांद्वारे शासनाच्या योजनांविषयी जनजागृती

569 0

पुणे : जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्यावतीने व जिल्हा नियोजन समितीच्या सौजन्याने लोककला पथकांच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध जन कल्याणकारी योजनांची जनजागृती मावळ तालुक्यात सुरू आहे.

या कार्यक्रमात पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी योजना, कन्यादान योजना व रमाई आवास योजना यासह विविध योजनांची माहिती ‘लोकशिक्षणासाठी मनोरंजन’ या स्वरुपात दिली जात आहे. कला पथकाच्या या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जान्हवी फांऊडेशन कलाथकाच्यावतीने मावळ तालुक्यातील लोणावळा, कार्ला, कामशेत, कान्हे, टाकवे, वडगाव मावळ याठिकाणी कार्यक्रम सादर केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंची आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Posted by - February 28, 2022 0
मुंबई- सरकारकडून संभाजीराजे छत्रपती यांना चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्षा बंगल्यावर सकाळी 11 वाजता चर्चा होणार आहे. अशी माहिती…

काल महाआरती आज पत्रकार परिषद ; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

Posted by - April 17, 2022 0
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.. काल पुण्यातील खालकर चौकातील हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून…
Beed News

Beed News : बीड हादरलं ! डोक्यात दगड घालून शाळेतील शिपायाची निर्घृणपणे हत्या

Posted by - July 21, 2023 0
बीड : सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. बीडमधून (Beed News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये शाळेतील…

भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवूया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Posted by - January 26, 2023 0
मुंबई:- ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *