सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली विभागाची बँकांच्या कामगिरीसंदर्भात आढावा बैठक संपन्न ; 13 प्रमुख बँकांचा सहभाग

143 0

मुंबई : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) विभागाने आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,  ताज सांताक्रूझ,येथे बँकांच्या कामगिरीसंदर्भात आढावा बैठक आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारांसोबत बैठक घेतली. व्यय विभागाअंतर्गत असलेल्या लेखा नियंत्रक कार्यालयाच्या पीएफएमएस विभागाच्या अतिरिक्त लेखा महानियंत्रक धरित्री पांडा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.

या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी वितरणा संदर्भातली नवीन पद्धत आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली बरोबर कोषागार समन्वयन या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. राज्य सरकारांनी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीला माहितीची देवाणघेवाण वेळेवर करावी जेणेकरून विश्वासार्ह आणि अचूक आर्थिक अहवाल सुनिश्चित होईल आणि या प्रणालीत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, यावर या बैठकीत भर देण्यात आला.

बँकिंग प्रणालीला नवीन बदलांना आत्मसात करता यावे या उद्देशाने महत्वाचे प्रमुख कामगिरी निर्देशक (KPIs) आणि एकल नोडल खाती या मुद्द्यांवर बँकांच्या कामगिरी बद्दलच्या आढावा बैठकीत अधिक भर देण्यात आला. या बैठकीला सह लेखा महानियंत्रक, पीएफएमएस विभाग, नवी दिल्ली, अमिताभ त्रिपाठी, एनआयसी- पीएफएमएस चे तंत्रज्ञ आणि गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानचे राज्य वित्त अधिकारी देखील उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, येस बँक आणि इंडसइंड बँक, या 13 प्रमुख बँका,बँकिंग पुनरावलोकनात सहभागी झाल्या होत्या.

Share This News

Related Post

पोलीस भरतीमधील वयोमर्यादेचा तांत्रिक अडथळा दूर; कुठे होणार किती पोलीस भरती? कोणत्या प्रवर्गाला किती जागा ? वाचा सविस्तर बातमी

Posted by - November 5, 2022 0
महाराष्ट्र : लवकरच महाराष्ट्रामध्ये 14,956 पोलीस भरती होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळामध्ये ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरले…
Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार; राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Posted by - August 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला…
RASHIBHAVISHY

कुंभ राशीसाठी आजचा दिवस मन उल्हासित करणारा; आनंदी घटना घडेल ! वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Posted by - January 11, 2023 0
मेष रास : आज तुम्हाला तुमच्या सवयीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे. ही सवय आहे संकटांबाबत सातत्याने चर्चा करणे , आणि…

PUNE CRIME कोल्हापूरचा ‘डॉक्टर डॉन’ इंदूरमधून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या जाळ्यात

Posted by - October 14, 2022 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातून एका व्यवसायिकाचे अपहरण झाले. या व्यवसायिकाकडून 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यासह बलात्काराचा खोटा…

मेट्रोच्या स्वागतासाठी बनवले मेट्रोच्या प्रतिकृतीचे की-चेन

Posted by - March 9, 2022 0
पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे.मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे कोथरूड मधील वाहतूक कोंडी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *