महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद : INS विक्रांतचे आज जलावतरण ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ध्वजाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

344 0

केरळ : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांत या महाकाय जहाजाचे जलावतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले . विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी हा सोहळा अभिमानास्पद ठरला , कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेल्या ध्वजाचे देखील लोकार्पण यावेळी करण्यात आला आहे. आय एन एस विक्रांत या जहाजाचे केरळच्या समुद्र तटावर आज जलावतरण होत आहे . महाकाय विक्रांत आज नेव्हीमध्ये दाखल झाले.

See the source image

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की , ” छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सामर्थ्याच्या जोरावर शत्रूंची झोप उडवणारी नौसेना उभारली होती. जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा , भारतीयांनी तयार केलेले जहाज आणि त्याद्वारे होणारा व्यापार पाहून इंग्रज देखील बिथरले होते. त्यामुळेच त्यांनी भारताचं सागरी सामर्थ्य तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ब्रिटिशांनी कायदे करून भारतीय जहाज आणि व्यापार यांवर कठोर प्रतिबंध लादले होते . हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करण्यात आला असून , २ सप्टेंबर 2022 च्या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलण्याच एक काम झालं आहे .”

“आज भारताचे गुलामीचे एक निशान …, गुलामीच एक ओझं आपल्या छातीवरून उतरवल आहे. आज भारतीय नौसेनेला एक नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत नेव्हीचा ध्वज हा गुलामीची ओळख होता. परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत नवा ध्वज तयार करण्यात आला आहे. हा ध्वज सागर आणि आकाशात डौलाने फडकेल असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ”

 

Share This News

Related Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची भेट; हर हर महादेव आणि वेढात मराठे वीर दौडले सात चित्रपट वादावर चर्चा

Posted by - November 16, 2022 0
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे हे त्याच्या पुण्यातील ‘राजमहाल’ निवासस्थानी पोहोचले आहेत. हर…

“तू ठाकरे है, तो मै भी राणा हु… देखते है किसमे कितनी ताकद है…!” खासदार नवनीत राणांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Posted by - September 6, 2022 0
जळगाव : जळगावमध्ये खासदार नवनीत राणा यांनी एका गणपती मंडळाच्या कार्यक्रमास हजेरी लावली. दरम्यान हनुमान चालीसा पठण प्रकरणावरून खासदार नवनीत…

छगन भुजबळ म्हणतात; “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटच देत नाहीत…!” वाचा सविस्तर

Posted by - November 16, 2022 0
शिंदे गटाचे आमदार, उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणून आरोप करत होते, पण मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Congress

Congress Loksabha : काँग्रेसची लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Posted by - March 8, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आता काँग्रेसने आपली यादी जाहीर केली…

मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश

Posted by - June 2, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गांधीनगर येथील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *