प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर फेटाळली, काँग्रेस पक्षात जाणार नाही

489 0

नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती. त्या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला असून प्राधान्य किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांनी याबाबत ट्विट केले आहे. प्रशांत किशोर यांनी देखील ट्विट करत काँग्रेसची ऑफर नाकारली असल्याचे म्हटले आहे.

प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीमध्ये काँग्रेसला २०२४ मध्ये सत्तेत येण्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर सोपवण्यात आली होती. काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जातील अशी अटकळ बांधली जात होती

या सर्व चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून प्रश्नात किशोर यांनी स्वतः ट्विट करून काँग्रेसची ऑफर नाकारत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल घडविण्यासाठी आणि काँग्रेसच्या संरचनात्मक समस्या दूर करण्यासाठी माझ्यापेक्षा सक्षम आणि सामूहिक इच्छाशक्तीची आवश्यकता आहे असे माझे विनम्र मत आहे. असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर, काँग्रेस अध्यक्षांनी एक सक्षम कृती गट 2024 तयार केला आहे आणि त्यांना गटाचा भाग होण्यासाठी आणि पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र प्रशांत किशोर यांनी तसे करण्यास नकार दिला आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : शिवनेरीच्या पायथ्याजवळ लावण्यात आलेले पीएम मोदी, सीएम शिंदेंचे पोस्टर फाडले; 5 जणांना अटक

Posted by - February 19, 2024 0
पुणे : पुणे (Pune News) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पंतप्रधान नरेंद्र…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : शिवसंग्राम फाउंडेशनचा रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा

Posted by - May 9, 2024 0
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर हे राष्ट्रीय काँगेस पक्षाकडून उमेदवार आहेत. आम्ही त्यांचे सामाजिक आणि राजकीय काम अनेक…
Devendra Fadanvis Tension

Devendra Fadanvis : मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Posted by - September 14, 2023 0
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरु केलेलं बेमुदत उपोषण अखेर आज 17 दिवसांनी मागे घेतले. मराठा आरक्षणासाठी आपला लढा…
Vasant More

Vasant More : ‘…तर मनसेचा पहिला खासदार मीच असेल’; वसंत मोरेंचे वक्तव्य

Posted by - September 3, 2023 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. काही आठवड्यांपूर्वीच बारामती…

#MURDER : पतीने रस्त्याच्या मधोमध पत्नीवर चाकूने केले ७ वार ; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Posted by - January 24, 2023 0
तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केली. घटनेनंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *