Breaking !कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा हृदयविकारानं मृत्यू

582 0

कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोण होते प्रभाकर साईल ?

क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे पंच हा पंच किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड होता. किरण गोसावींकडेच याची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था असायची.

क्रुझ कारवाईच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ?

प्रभाकर साईल यांनी जबाबात सांगितलं होतं की, ‘क्रूझ कारवाई झाली त्या दिवशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले. मी खालीच थांबलो होतो. गोसावी बरोबर सव्वा बारा वाजता खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊन फ्रँकी, थम्स अप घेतलं. तिथू ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तेव्हा तिथे समीर वानखेडे, त्यांचे सहकारी बसले होते. तिथे त्यांना फ्रँकी आणि पाणी-थम्सअप वगैरे दिले. नंतर क्रूझच्या बाहेर गेलो. तिथून मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको, असं सांगितलं. मला काही फोटो दाखवण्यात आले होते आणि ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं’.

Share This News

Related Post

Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक

Posted by - February 23, 2024 0
ठाणे : संकेत भोसले हत्या प्रकरणी (Sanket Bhosle Murder Case) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी…

पुण्यात ट्रॅफिक जॅम ! अपघातामुळे नाही तर प्रेमी युगुलाच्या रोमान्समुळे, पहा व्हिडिओ

Posted by - March 31, 2023 0
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे आहे म्हणतात. पण हेच प्रेम ज्यावेळी सार्वजनिक होऊ लागते त्यावेळी त्याचे हसे होते…

निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले  तेंव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले!

Posted by - October 9, 2022 0
मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज…

प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली- जगदीश मुळीक

Posted by - July 4, 2022 0
आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी…

महाविकास आघाडीला धक्का ! नवाब मलिकांना राज्यसभेसाठी मतदानाची परवानगी नाहीच ! पण….

Posted by - June 10, 2022 0
मुंबई- राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे असताना नवाब मलिक यांच्या याचिकेवर सत्र न्यायालयानं दिलेला निकाल उच्च न्यायालयाकडून कायम ठेवला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *