Decision Cabinet Meeting : राज्यात वीज वितरण प्रणाली मजबूत करणार ; ग्राहकांसाठी प्रिपेड-स्मार्ट मिटर बसविणार

106 0

मुंबई  : राज्यातील विद्युत वितरण प्रणाली मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेसाठी महावितरण कंपनीच्या 39 हजार 602 कोटी व बेस्टच्या 3 हजार 461 कोटी रकमेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली.

या योजनेनुसार 2024-25 पर्यंत एकूण तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी 12 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र, नवीन वाहिन्या यांची कामे करण्यात येतील.

राज्यातील ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मिटर बसविण्यात येतील. याचा सुमारे 1 कोटी 66 लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांना देखील मिटर बसविण्यात येईल. केवळ मिटर्स बसविण्यासाठी 10 हजार कोटींचा निधी अपेक्षित आहे.
या वीज कंपन्यांची कार्यक्षमता सुधारुन ग्राहकांना अखंड, दर्जेदार आणि परवडणारा वीज पुरवठा देण्यासाठी
सुधारित वितरण क्षेत्र योजना- सुधारणा-अधिष्ठित आणि निष्पती- आधारित योजना राबविण्यात येईल. महावितरण आणि बेस्ट उपक्रमामार्फत ही योजना राबविणार आहे.

Share This News

Related Post

#FRAUD : बंगला खरेदी करण्याच्या बहाण्याने बनावट कागदपत्र बनवून बँकेतून घेतले 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज, मालकाच्या लक्षात आल्यावर …

Posted by - January 28, 2023 0
पुणे : बंगला खरेदी करण्याच्या पाहण्याने बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज मंजूर करून घेऊन…

दृष्टिक्षेपात राजस्थान ; सचिन पायलट ठरणार का राजस्थानचे एकनाथ शिंदे ?

Posted by - September 26, 2022 0
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही…

#ACCIDENT : कोल्हापुरात दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर धडक; दोघांचाही मृत्यू

Posted by - February 14, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Posted by - November 29, 2022 0
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ…

कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; एकनाथ शिंदेचं आवाहन

Posted by - June 30, 2022 0
राज्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आपल्या विधान परिषद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *