कसबा आणि चिंचवडमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात दोन्हीही मतदारसंघात मोठा पोलीस बंदोबस्त, आतापर्यंत काय झाले ?

254 0

पुणे : आज अखेर कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर अखेर आजचे ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आज सकाळपासूनच दोन्हीही मतदारसंघांमध्ये मतदारांनी हजेरी लावून आपले कर्तव्य बजावले आहे. आत्तापर्यंत कसबा मध्ये 6.5% मतदान पार पडले असून चिंचवड मध्ये 3. 52% टक्के मतदान पार पडले आहे.

दरम्यान कसबा मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यामध्ये लढत होते आहे.

तर चिंचवड मतदार संघामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप राष्ट्रवादीकडून,महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होते आहे.

आज दोन्हीही मतदार संघांमध्ये मिळून 510 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आहे. यामध्ये 13 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. तर आज पाच लाख 68 हजार मतदाता आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Share This News

Related Post

#NITESH RANE : “…तर दीपक केसरकर यांना निवडून आणणे आमची जबाबदारी असेल !”

Posted by - March 11, 2023 0
कणकवली : राज्यात भाजप शिवसेनेची युती असल्याने भविष्यात २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एक मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेला तर विद्यमान…

#HEALTH WEALTH : तुम्हालाही उरलेला चहा पुन्हा गरम करून पिण्याची सवय आहे का ? लगेच थांबवा, अन्यथा अनेक रोगांना मिळते आमंत्रण

Posted by - March 14, 2023 0
चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे किंवा किंबहुना ते भारताचे अनधिकृत राष्ट्रीय पेय बनले आहे. चहावर इतके प्रेम करणारे…

विवाहानंतर पॅनकार्डमध्ये नवीन नाव आणि पत्ता अपडेट करणे गरजेचे; अन्यथा…

Posted by - October 29, 2022 0
विवाहानंतर मुलीचे घर बदलते आणि आडनावही. अर्थात आडनाव बदलणे आवश्यक नाही, परंतु विवाहानंतर आडनावात बदल होत असेल तर पॅनकार्डमध्ये अपडेट…

पुणे : “गुरु हे वाट दाखवणारे दीपस्तंभ” – अजित पवार

Posted by - July 12, 2022 0
पुणे : समाजात आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या गुरुजनांना सन्मानित करण्याचा उपक्रम सातत्याने राबवला जातो आहे. ही स्तुत्य बाब आहे.…
Pune News

Pune News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

Posted by - November 27, 2023 0
पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेची दिनांक 26 /11 /2023 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड कलादालन येथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *